
विशेष प्रतिनिधी
द्वारका : धाडसी मोहिमा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाते जुने आणि अतूट आहे याचा प्रत्यय पंतप्रधान मोदींच्या आजच्या द्वारकेतल्या स्कूबा डायव्हिंग मधून आला.Prime Minister Modi took darshan of Dwarka in the sea while scuba diving, offered Morpis!!
जानेवारी महिन्यात लक्षद्वीपमध्ये स्कॉनर्कलिंगचाही आनंद घेणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय पारंपारिक पोशाखामध्ये स्कूबा डायव्हिंग करत समुद्राच्या तळाशी असलेली द्वारका पाहण्यासाठी पोहोचले. पंतप्रधान मोदींनीच त्यांच्या एक्स (ट्वीटर) अकाऊंटवरुन या द्वारका भेटीचे फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या 2 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. याच दौऱ्यादरम्यान त्यांनी द्वारकाधीश्वर मंदिराला भेट दिली. मनोभावे पूजा केल्यानंतर पंतप्रधान थेट समुद्राच्या तळाशी बुडालेल्या द्वारका शहराचे दर्शन घेण्यासाठी स्कूबा डायव्हिंग केले. मोदींनीच हे फोटो शेअर केले. मोदींनी ‘जय द्वारकाधीश’ म्हणत मंदिरामध्ये श्रीकृष्णाचे दर्शन घेतल्याचे फोटो शेअर केले.
पुरातन काळाशी कनेक्ट झालो
समुद्रामध्ये स्कूबा डायव्हिंग केल्याचे फोटो शेअर करत मोदींनी हा अनुभव दैवी होता असं म्हटलं आहे. “पाण्याखाली असलेल्या द्वारका शहरामध्ये प्रार्थना करण्याचा अनुभव फारच दैवी होता. समुद्रात द्वारकेच्या दर्शनाच्या वेळी मी पुरातन काळाशी कनेक्ट झाल्यासारखं मला वाटलं. श्री कृष्णाची आपल्या साऱ्यांवर अशीच कृपा कायम राहू देत,” असेही पंतप्रधानांनी म्हटले.
To pray in the city of Dwarka, which is immersed in the waters, was a very divine experience. I felt connected to an ancient era of spiritual grandeur and timeless devotion. May Bhagwan Shri Krishna bless us all. pic.twitter.com/yUO9DJnYWo
— Narendra Modi (@narendramodi) February 25, 2024
भारतीय पोशाखात स्कूबा डायव्हिंग
समुद्रातील द्वारकेच्या दर्शनासाठी जाताना पंतप्रधानांनी भगव्या रंगाचा कुर्ता आणि जॅकेट म्हणजेच पारंपारिक भारतीय पोशाख परिधान केला होता. कृष्णाचे प्रतिक असलेले मोराच्या पिसंही मोदींनी सोबत नेले होते, ते त्यांनी कृष्णाला अर्पण केले.
जानेवारीत लक्षद्वीपला जाऊन आले मोदी
जानेवारी महिन्यातच लक्षद्वीपमध्ये स्कॉनर्कलिंगनंतर पंतप्रधान मोदींनी अशाप्रकारे सोशल मीडियावर फोटो शेअर केले होते. त्यावेळेस मोदींनी, ‘हा अनुभव फारच थरारक आणि आनंद देणारा आहे’, फोटो कॅप्शनमध्ये म्हटलं होतं. लाइफ जॅकेट घालून समुद्रातून बाहेर येताना पंतप्रधान मोदींचा लक्षद्वीपमधील फोटो चर्चेचा विषय ठरला होता. यावेळेस मोदींनी लक्षद्वीपच्या सुंदर समुद्रकिनारी वॉकचाही आनंद घेतला होता. लक्षद्वीपमधील काही फोटोंमध्ये पंतप्रधान मोदी समुद्रकिनाऱ्यावर खुर्चीवर बसून अथांग समुद्र न्याहाळताना, वाचन करताना पाहायला मिळाले होते
Prime Minister Modi took darshan of Dwarka in the sea while scuba diving, offered Morpis!!
महत्वाच्या बातम्या
- नाट्यसंस्कृतीला अधिक बळकट करण्यासाठी राज्यात ७५ नाट्यगृहे अद्ययावत करण्यात येणार – मुख्यमंत्री शिंदे
- हल्दवानी हिंसाचाराचा मास्टरमाइंड अब्दुल मलिकला दिल्लीतून अटक
- 40 वर्षांनंतर पवारांना आत्ता रायगड आठवला!!; फडणवीस + राज ठाकरेंचा निशाणा
- अखिलेश यादव राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेत सामील होणार, पण तिला PDA यात्रा म्हणणार!!