भारताचे मत अगदी स्पष्ट आहे, हे युद्धाचे युग नाही. असंही मोदी म्हणाले
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पोलंड दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदींनी (Prime Minister Modi )तेथे राहणाऱ्या भारतीयांना संबोधित करताना जगाला थेट संदेश दिला आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, आजचे भारताचे धोरण सर्व देशांशी समानतेने जवळीक राखण्याचे आहे. आजचा भारत सर्वांसोबत आहे आणि सर्वांचा विचार करतो. आता परिस्थिती बदलत आहे. आजच्या भारताला सर्वांशी जोडायचे आहे. आज जग भारताला विश्वबंधू मानत आहे.
पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या पोलंड दौऱ्यावर आहेत. येथे भारतीयांना संबोधित करताना ते म्हणाले की, आजच्या भारताला आपल्या वारशाचा अभिमान आहे. भारत विकासाकडे वाटचाल करत आहे. भारतीय प्रत्येक क्षेत्रात देशाला गौरव मिळवून देत आहेत. प्रत्येक क्षेत्रात भारतीयांचा दबदबा आहे. कोणत्याही देशावर संकट आले तर भारत नेहमीच मदतीसाठी पुढे येतो. भारताने कोविडमध्ये माणुसकी दाखवली. कोविड दरम्यान आम्ही 150 हून अधिक देशांमध्ये औषधे पाठवली. भारतासाठी मानवता प्रथम आहे. भारत जगभरातील नागरिकांना मदत करतो. भारत ही बुद्धाच्या वारशाची भूमी आहे. भारत युद्धावर नव्हे तर शांततेवर विश्वास ठेवतो. त्यामुळे भारत हा कायमस्वरूपी शांततेचाही मोठा पुरस्कर्ता आहे. भारताचे मत अगदी स्पष्ट आहे, हे युद्धाचे युग नाही.
मोदी म्हणाले की, काही दिवसांपूर्वी तुम्ही पोलंडमध्ये भारताच्या स्वातंत्र्याचा उत्सव साजरा केला होता. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी समृद्ध भारताचे स्वप्न पाहिले होते, आज ते स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येक भारतीय प्रयत्नशील आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App