‘1 लाख रुपये कुठे आहेत, आणा…’ काँग्रेसच्या ‘या’ घोषणेचा पंतप्रधान मोदींनी घेतला समाचार

सामान्य नागरिकांचा असा अपमान देश कधीही विसरत नाही आणि कधीही माफ करणार नाही, असंही म्हटले आहे.


विशेष प्रतिनिधी

लखनऊ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएच्या बैठकीत घटक पक्षाचे नेते आणि भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या आश्वासनाचाही उल्लेख केला, ज्यात काँग्रेस पक्षाने ४ जूननंतर जनतेला १ लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते.Prime Minister Modi criticized the Congress by reminding them of the promise of Rs 1 lakh Rupees



पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘हे लोक खूप खोटे बोलत आहेत. निवडणुकीच्या वेळी देशातील सर्वसामान्य नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी स्लिप वाटून हे आणि ते देणार असल्याचे सांगितले आहे. गेल्या दोन दिवसांपासून मी बघतोय लोक काँग्रेसच्या कार्यालयासमोर रांगेत उभे राहून ‘ही स्लिप घ्या, एक लाख रुपये आणा,’ असे विचारताना दिसत आहे, तुम्ही जनता जनार्दनच्या डोळ्यात धूळफेक केली की, त्या गरीब सामान्य माणसाला 4 जूननंतर 1 लाख रुपये मिळतील असे गृहीत धरले होते, म्हणून तो जाऊन उभा राहिला, आता त्याला ढकलले जात आहे, मारहाण केली जात आहे.

याशिवाय पीएम मोदी म्हणाले, ‘आता निवडणुकीचा हा प्रकार म्हणजे देशातील गरिबांचा अपमान आहे. आपल्या देशातील सामान्य नागरिकांबद्दलच्या अशा अपमान आणि कृत्यांना देश कधीही विसरत नाही आणि कधीही माफ करणार नाही. मित्रांनो, आम्ही वचनबद्धतेने काम करतो ही आमच्यासाठी समाधानाची बाब आहे. 10 वर्षात 25 कोटी गरीब लोकांना गरिबीतून बाहेर काढले आहे.

Prime Minister Modi criticized the Congress by reminding them of the promise of Rs 1 lakh Rupees

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात