विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी आणि इतर योजनातून देशातील करोडो शेतकºयांना नवीन बळ मिळत आहे, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.ट्विटमध्ये पंतप्रधानांनी म्हटले आहे की, सशक्त शेतकरी ही समृद्ध राष्ट्राची गुरुकिल्ली आहे. देशाला आपल्या शेतकरी बांधवांचा अभिमान आहे.Prime Minister Kisani Sanman Nidhi Yojana gives new impetus to crores of farmers,
तसेच देशातील शेतकरी अधिक सक्षम झाला तर भारत अधिकाधिक समृद्ध होईल. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी आणि शेतीशी संबंधित इतर योजना देशातील करोडो शेतकऱ्यांना नवीन बळ मिळत आहे. देशातील ११.३ कोटी शेतकऱ्यांना या योजनांचा थेट फायदा झाला आहे,
ज्यामध्ये 1.82 लाख कोटी रुपये थेट त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. याशिवाय पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपयांची मदत मिळाली आहे. कोरोना महामारी दरम्यान 1.30 लाख कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित करण्यात आली आहे. त्याचा फायदा विशेषत: मध्यमवर्गीय शेतकऱ्यांना झाला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App