बँक खात्याला आधार लिंक नसल्यास शेतकरी सन्मान निधीचा नाही लाभ


देशातील दोन लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी बँक खात्याला आधार लिंक केलेले नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना पंतप्रधान सन्मान निधीचा लाभ मिळणार नाही असा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक असेल अशाच खात्यावर पीएम किसान निधी जमा होणार आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशातील दोन लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी बँक खात्याला आधार लिंक केलेले नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना पंतप्रधान सन्मान निधीचा लाभ मिळणार नाही असा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक असेल अशाच खात्यावर पीएम किसान निधी जमा होणार आहे.
आतापर्यंत या योजनेतील लाभार्थ्यीच्या बँक खात्यामध्ये किंवा आधार लिंक बँक खात्यात पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होत होता. मात्र, आता तो पर्याय बंद करण्यात आला आहे. If the bank account does not have Aadhaar link then no benefit of Shetkari Sanman Nidhi

अजूनही 2.79 लाख लाभार्थ्यांनी आधार कार्ड दिलेला नाही किंवा त्यानी दिलेल्या आधार कार्ड क्रमांकामध्ये काही त्रुटी असल्याने ते प्रमाणित होऊ शकलेले नाही. त्यामुळे या शेतकºयांनी तातडीने बँक खात्याला आधार कार्ड लिंक करुन घेण्याचे आवाहन सरकारच्या वतीने करण्यात आले आहे. आधार लिंक खात्यावर पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होणार आहे.



 

पीएम किसान म्हणजेच पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना 1 डिसेंबर 2018 पासून देशात लागू करण्यात आली. या योजनअंतर्गत देशातल्या शेतकऱ्यांना प्रतिवर्ष 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा दहावा हप्ता यावर्षीच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते वितरित करण्यात आला. पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत 10 कोटींहून अधिक शेतकरी कुटुंबीयांच्या खात्यात 20 हजार कोटींहून अधिक रक्कम ट्रान्सफर करण्यात आली आहे.

सरकारने सुरुवातीला 2 हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांचा या योजनेत समावेश केला होता. पण, नंतर या योजनेची व्याप्ती वाढवून सगळ्याच शेतकऱ्यांना म्हणजे शेतकऱ्याकडे किती जमीन आहे याचा विचार न करता सगळ्याच शेतकऱ्यांना या योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत प्रतिवर्ष 4 महिन्यांच्या अंतराने दोन हजार रुपयांचे तीन हप्ते शेतकºयांच्या बँक खात्यात जमा केले जातात.

If the bank account does not have Aadhaar link then no benefit of Shetkari Sanman Nidhi

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात