विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : खासदार गौतम गंभीरच्या रूपाने भाजपमध्ये स्वतःहून भाकरी फिरवून घेण्यास सुरुवात झाली आहे. पूर्व दिल्लीचा खासदार गौतम गंभीर याने स्वतःला जबाबदारी मोकळे करण्याची विनंती भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना केली आहे.Preparedness to turn bread on its own in BJP; Request to release Gautam Gambhir from the responsibility of MP!!
भाजपने 2019 च्या लोकसभा निवडणुकीत गौतम गंभीरला पूर्व दिल्लीतून खासदार महेश गिरी यांच्या जागी उमेदवारी देऊन निवडून आणले होते. गौतम गंभीरने त्यावेळी दिल्लीच्या विद्यमान अर्थमंत्री आणि त्यावेळच्या आम आदमी पार्टीच्या उमेदवार अतिशी मार्लेना यांचा पराभव केला होता. खासदार म्हणून त्यांची कामगिरी चांगली असली, तरी क्रिकेटमधल्या कमिटमेंट्स पाळणे महत्त्वाचे असल्याने आपल्याला जबाबदारीतून मुक्त करावे, असे पत्र गौतम गंभीरने निर्णय पाठविले आहे. त्यामुळे पूर्व दिल्लीला नवा खासदार देण्याची मोकळीक भाजपला मिळाली आहे.
Gautam Gambhir requests BJP chief to relieve him of political duties Read @ANI Story | https://t.co/0GAUJfgHGi#GautamGambhir #KKR #cricket #IPL pic.twitter.com/3O88wlWjMm — ANI Digital (@ani_digital) March 2, 2024
Gautam Gambhir requests BJP chief to relieve him of political duties
Read @ANI Story | https://t.co/0GAUJfgHGi#GautamGambhir #KKR #cricket #IPL pic.twitter.com/3O88wlWjMm
— ANI Digital (@ani_digital) March 2, 2024
भाजपमध्ये 303 खासदारांपैकी 70 – 80 खासदारांची तिकिटे कापली जाण्याच्या अटकळी बांधल्या गेल्या आहेत. याचा अर्थ मोदी – शाह बऱ्याच भाकऱ्या फिरवण्याच्या बेतात आहेत. या पार्श्वभूमीवर गौतम गंभीरने स्वतःहून आपली भाकरी फिरवून घेतली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App