मोदी सरकारवर आरोप करणाऱ्या ध्रुव राठीची प्रशांत पिट्टीने केली पोलखोल?

Prashant Pitti exposed the lies of Dhruv Rathi who accused the Modi government

जाणून घ्या, नेमकं काय आहे प्रकरण आणि कोण आहेत प्रशांत पिट्टी?. Prashant Pitti exposed the lies of Dhruv Rathi who accused the Modi government

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी देशभर सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांमध्ये नव्हे तर त्यांच्या समर्थकांमध्येही जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अशातच यूट्यूबर ध्रुव राठीनेही एक व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला ज्यामध्ये भाजप नेते मनोज तिवारी दिसत आहेत आणि यावरून त्यांच्यावर ध्रुव राठीने टीका सुद्धा केली आहे. परंतु ध्रुव राठीच्या या व्हिडीओची एकप्रकारे पोलखोल झाल्याचे समोर येत आहे.

कारण EaseMyTripचे सहसंस्थापक प्रशांत पिट्टीने असा दावा केला आहे की, हा व्हिडीओ मॉर्फ केलेला आहे. व्हिडीओशी छेडाछाड करून भारत सरकारवर टीका केल्याबद्दल त्यांनी ध्रुव राठीला फटकारलं आहे.

प्रशांत पिट्टी यांनी ध्रुव राठीला मोदी सरकारच्या काळात भारतात झालेल्या विकास कामांवर चर्चा करण्यासाठी आव्हान दिलं आहे. एवढंच नाहीतर प्रशांत पिट्टी यांनी या चर्चेसाठी ध्रुव राठीला जर्मनीतून भारतात येण्यासाठी मोफत विमान तिकीट पुरण्याचीही तयारी दर्शवली आहे.

त्यांनी ध्रुव राठीला उद्देशून म्हटले की हा व्हिडीओ एडिटेड केल्याचे दिसत आहे आणि तुम्ही हे चांगल्याप्रकारे जाणत असाल. जर तुमचं धोरण खरंच एक चांगला भारत बघण्याचं असेल( आपलं बँक खातं वाढवणं नाही) तर तुम्ही विद्यमान सरकारवर टीका करण्या व्यतिरिक्त चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही गोष्टी दाखवाल.

तसेच, मी तुम्हाला चर्चेत विद्यमान सरकारने भारताला उत्कृष्ट बनवण्यासाठी कशाप्रकारे बदल केले आहेत, यावर आकडेवारीसह वास्तव माहिती दाखवेल असं म्हटलं आहे. तसेच, ध्रुव राठीचं पितळ उघडं पडलं आहे आणि आता तो हैराण आहे. असंही शेवटी लिहिलं गेलं आहे.

Prashant Pitti exposed the lies of Dhruv Rathi who accused the Modi government

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात