विशेष प्रतिनिधी
पुणे : बड्या बापाच्या बेट्याने दारूच्या नशेत बेफाम गाडी चालवून पुण्यात दोन बळी घेतल्यानंतर त्याचा माज उतरला नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. बिल्डर विशाल अग्रवाल याचा मुलगा वेदांत अग्रवालच्या नावाने एक रॅप सॉंग सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. एक दिन मे मुझे मिल गई बेल फिर से दिखाऊंगा सडक पे खेल!! असे हे रॅप सॉंग आहे. Abusive rap song of vedant agrawal viral on social media
बिल्डर बापाच्या पैशावर मजा मारून, दोन निष्पापांचा जीव घेऊन व्यवस्थेच्या परवानगीने एका दिवसांत जामीन घेतल्यानंतर पुणे पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन आरोपी वेदांत अग्रवालच्या नावाने एक रँप साँग व्हायरल होत आहे.
विशाल अग्रवाल सुरेंद्रकुमार अग्रवाल यांचे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनशी संबंध असल्याचे आधीच उघड झाले आहे. त्याचबरोबर अग्रवाल कुटुंब आणि पवार कुटुंबांच्या काही व्यावसायिक भागीदारी देखील उघडपणे चर्चिली जात आहे. वेदांत अग्रवाल याचा वकील विशाल पाटील हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा नेता असल्याचेही उघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर दोन तरुण जिवांचा बळी घेतलेल्या बड्या बापाच्या बेट्याचे कारनामे थांबलेले नसल्याचे बोलले जात आहे त्यातूनच हे रॅप सॉंग व्हायरल झाले आहे.
दोन निष्पापांचा जीव घेऊनही त्याच्या चेहऱ्यावर अस्वस्थतेचा लवलेशही दिसत नाही, उलट त्याच्या ठायी ठायी पक्का माजोर्डेपणा ठासून भरलेला दिसतोय. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या रॅपसाँगच्या व्हिडीओची पुष्टी सध्या तरी कोणतीही माध्यमे करत नाहीत, पण या रॅप सॉंग मधली भाषा मात्र शिवीगाळीनी भरलेली आणि आक्षेपार्ह आहे. संबंधित रॅप संस्था व्हिडिओ हा डीप फेक व्हिडिओ असू शकतो किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून त्यात फेरफार केला जाऊ शकतो, असे बोलले जात आहे.
वेदांत अग्रवालचे वकील विशाल पाटील यांनी संबंधित व्हिडिओ वेदांतचा असल्याचा दावा फेटाळून लावला आहे.
रॅपमधून शिवीगाळ…..
करके बैठा मै नशे…इन माय पोर्शे सामने आया मेरे कपल, अब वो है निचे साऊंड सो क्लिशे.. सॉरी गाडी चढ गई आप पे १७ की उमर पैसे खूब है मेरे बाप के पास एक दिन में मुझे मिल गई बेल, फिरसे दिखाऊंगा सडक पे खेल प्लेइंग केरोसिन फोन्क इन माय नेक्स्ट स्पोर्ट्स कार चार यार मेरे साथ फाड देंगे
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App