वृत्तसंस्था
रत्नागिरी : कोकणाला अरबी समुद्रातील चक्रीवादळाचा मोठा फटका बसला. वाऱ्यामुळे झाडांची पडझड झाली वीजपुरवठा खंडित झाला होता. परंतु , चक्रीवादळानंतर काही तासांत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी रत्नागिरी आणि सिंधदुर्ग या जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक गावांचा वीजपुरवठा सुरळीत केला. Power Supply restored By Mahavitran employee in Ratnagiri and Sindhudurg district
रत्नागिरी आणि सिंधदुर्ग या जिल्ह्यातील 3665 गावांमधील वीजयंत्रणेला वादळाने मोठा तडाखा दिला. यामध्ये 18 लाख 43 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा विस्कळीत झाला. त्यापैकी 52 टक्के ग्राहकांचा वीजपुरवठा सोमवारी दुपारपर्यंत पूर्ववत झाला. चक्रीवादळाने सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील मोठी वीजयंत्रणा जमीनदोस्त केली आहे. या उर्वरित ग्राहकांचा वीजपुरवठा सुरु करण्यासाठी महावितरणचे 13 हजार 172 कर्मचारी दुरुस्तीचे काम करत आहेत.
अवघ्या अर्धा ते दोन तासांत वीजपुरवठा सुरळीत
चक्रीवादळामुळे महावितरणच्या 138 उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद पडला होता. त्यापैकी 78 उपकेंद्र सुरु करण्यात आले आहेत. तर 706 पैकी 439 वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा सुरु केला आहे. चार ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पांसह 210 पैकी 173 कोविड सेंटर्स आणि लसीकरण केंद्रांचा वीजपुरवठा अवघ्या अर्धा ते दोन तासांमध्ये पूर्ववत करण्यात आला. उर्वरित ठिकाणी काम सुरु आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App