कालच UPSC ने तिची उमेदवारी रद्द केली आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकरला ( Pooja Khedkars )उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. तिचा अटकपूर्व जामीन अर्ज पटियाला हाऊस कोर्टाने फेटाळला आहे. यापूर्वी केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) पूजा खेडकरची प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी म्हणून केलेली निवड रद्द केली होती.
याशिवाय भविष्यात आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या कोणत्याही परीक्षेला बसण्यासही बंदी घालण्यात आली आहे. यूपीएससीने तिला अनेक वेळा बनावट ओळख वापरून परीक्षेत बसल्याबद्दल दोषी ठरवले आहे. यूपीएससीने एका निवेदनात म्हटले आहे की, पूजा खेडकर नागरी सेवा परीक्षेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळली आहे.
18 जुलै 2024 रोजी नागरी सेवा परीक्षा-2022 (CSE-2022) ची तात्पुरती शिफारस केलेली उमेदवार पूजा मनोरमा दिलीप खेडकर हिला संघ लोकसेवा आयोगाने (UPSC) फसवणूक केल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस (SCN) बजावली होती. आपली बनावट ओळख दाखवून तिने परीक्षेच्या नियमांमध्ये दिलेल्या अनुज्ञेय मर्यादेपेक्षा जास्त प्रयत्न केले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App