पंतप्रधान मोदी म्हणाले, दहशतवादाने श्रद्धा दडपली जाऊ शकत नाही, सोमनाथ मंदिर आमच्या श्रद्धेचे प्रेरणास्थान !

Pm Narendra Modi Gujarat Visit For Unveil Multiple Project Somnath Temple Parvati Temple Walkway

Pm Narendra Modi Gujarat Visit : गुजरातच्या ऐतिहासिक सोमनाथ मंदिराला मोठी भेट मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमनाथ मंदिरात अनेक नवीन योजनांना सुरुवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमनाथ ‘समुद्र दर्शन’ पदपथ, सोमनाथ प्रदर्शन केंद्र आणि नवीन अहिल्याबाई होळकर मंदिराचे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन केले. तसेच श्रीपार्वती मंदिराची पायाभरणी केली. पार्वती मंदिर पांढऱ्या दगडांनी बांधले जाईल आणि त्याची उंची 71 फूट असेल. Pm Narendra Modi Gujarat Visit For Unveil Multiple Project Somnath Temple Parvati Temple Walkway


वृत्तसंस्था

अहमदाबाद : गुजरातच्या ऐतिहासिक सोमनाथ मंदिराला मोठी भेट मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमनाथ मंदिरात अनेक नवीन योजनांना सुरुवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमनाथ ‘समुद्र दर्शन’ पदपथ, सोमनाथ प्रदर्शन केंद्र आणि नवीन अहिल्याबाई होळकर मंदिराचे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन केले. तसेच श्रीपार्वती मंदिराची पायाभरणी केली. पार्वती मंदिर पांढऱ्या दगडांनी बांधले जाईल आणि त्याची उंची 71 फूट असेल.

दहशतवादाचे अस्तित्व कायमस्वरूपी नाही : पंतप्रधान मोदी

कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, श्रावण महिन्यात एक मोठी सुरुवात झाली आहे. दहशतवादामुळे श्रद्धा दडपली जाऊ शकत नाही, सोमनाथ मंदिर हे आमच्या श्रद्धेचे प्रेरणास्थान आहे. ते म्हणाले की, सोमनाथ मंदिराचे अस्तित्व नष्ट करण्याचे अनेक प्रयत्न झाले, हे मंदिर जेवढ्या वेळा पाडले गेले तेवढ्या वेळा ते उभे राहिले. दहशत फार काळ मानवतेला खाली आणू शकत नाही. दहशतीचे अस्तित्व कायम असू शकत नाही. जग अजूनही दहशतवादाच्या विचारसरणीने त्रस्त आहे. भूतकाळातील अवशेषांवर आधुनिक वैभव बांधले गेले आहे. सोमनाथ मंदिर हे समृद्ध भारताचे प्रतीक आहे. पंतप्रधान म्हणाले की, देशाची मूळ भावना सबका साथ, सबका विकास आहे.

पीएम मोदींनी सरदार पटेल यांची कामे पुढे घेऊन आपल्या भाषणाची सुरुवात केली. ते म्हणाले की, सोमनाथ मंदिराला भव्यता देण्याचे काम सुरू आहे. धार्मिक पर्यटनातून उत्पन्न वाढेल. यासोबतच तरुणांना रोजगारही मिळणार आहे.

भाविकांकडून मंदिराचे ऑनलाइन दर्शन – अमित शहा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमाला संबोधित करताना अमित शहा म्हणाले की, पीएम मोदींनी मुख्यमंत्री म्हणून सोमनाथ मंदिराचा विकास सुरू केला होता, आज लोक ऑनलाइनद्वारे या मंदिराला भेट देत आहेत. शहा म्हणाले की, या मंदिरावर अनेक वेळा हल्ला झाला, पण प्रत्येक वेळी हे मंदिर उभे राहिले.

अहिल्याबाई होळकर मंदिर हे आजही जुने सोमनाथ मंदिर म्हणून ओळखले जाते. त्याच्या नूतनीकरणासाठी 3.5 कोटी खर्च केले जातील. त्याचबरोबर एक किलोमीटर लांबीच्या ‘समुद्र दर्शन’ पायवाटेच्या बांधकामासाठी सुमारे 47 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. सोमनाथ प्रदर्शन केंद्र हे सोमनाथ मंदिर परिसरातील पर्यटक सुविधा केंद्राजवळ बांधण्यात आले आहे.

Pm Narendra Modi Gujarat Visit For Unveil Multiple Project Somnath Temple Parvati Temple Walkway

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात