G20 शिखर परिषद उद्घाटनात पंतप्रधान मोदींचा सबका साथ सबका विकासचा नारा!!; आफ्रिकन युनियन अध्यक्षांचेही केले स्वागत

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारताच्या अध्यक्षतेखाली सुरू झालेल्या अत्यंत महत्त्वाकांक्षी G20 शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास हा नारा देत संपूर्ण जगाला वसुधैव कुटुम्बकम हा भारताचा संदेश दिला. PM Modi’s Sabka Saath Sabka Vikas slogan at the opening of the G20 summit

G20 शिखर परिषद तब्बल 45 देशांच्या प्रमुखांच्या सहभागात राजधानी नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर भारत मंडप मध्ये सुरू झाली. तिचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या भाषणाने झाले.

यावेळी बोलताना मोदी म्हणाले, की कोविड महामारी नंतर संपूर्ण जगात विश्वासाचा एक अभाव तयार झाला आहे. रशिया – युक्रेन युद्धाने हा अभाव जास्त खोलवर जात चालला आहे. पण आपण एकत्र येऊन जर कोविड सारख्या महामारीला हरवू शकतो, तर अविश्वासाचे वातावरण देखील आपण दूर करू शकतो, असा मला विश्वास वाटतो. हीच ती वेळ आहे,

ज्यावेळी आपण सबका साथ सबका विकास सबका विश्वास आणि सबका प्रयास हा महामंत्र अनुसरून पुढे चालत राहिले पाहिजे. जागतिक अर्थव्यवस्थेत मोठे उलटफेर होत असताना उत्तर – दक्षिण, पूर्व – पश्चिम असा भेद तयार होतो आहे. तो भेद आपण एकत्र येऊनच मिटवला पाहिजे. जागतिक अन्न समस्या, इंधन समस्या, दहशतवाद, सायबर सुरक्षा, आरोग्य, ऊर्जा, जलसुरक्षा या सर्व जागतिक विषयांवर एकजुटीनेच तोडगा काढला पाहिजे. कारण या सर्व समस्या आपल्या एकजुटी अभावी तयार झाल्या आहेत. आपण एकजूट दाखवली तर या समस्यांवर सर्वंकष तोडगा काढता येऊ शकेल, असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला

यावेळी त्यांनी आफ्रिकन युनियनच्या अध्यक्षांचा G20 चे स्थायी सदस्य म्हणून स्वागत केले.

तत्पूर्वी पंतप्रधान मोदींनी भारत मंडप मध्ये 45 देशांच्या राष्ट्राध्यक्षांचे भारत मंडप मधील सूर्यचक्रा नजीक स्वागत केले. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांना त्यांनी सूर्यचक्राचा अर्थ समजावून सांगितला. कोणार्कच्या सूर्य मंदिरातील हे सूर्यचक्र. त्याची प्रतिकृती भारत मंडप मध्ये मुख्य स्थानी लावली आहे. तेथेच उभे राहून पंतप्रधान मोदींनी 45 देशांच्या राष्ट्राध्यक्षांचे स्वागत केले.

 

PM Modi’s Sabka Saath Sabka Vikas slogan at the opening of the G20 summit

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात