विशेष प्रतिनिधी
भुवनेश्वर : पश्चिम बंगाल आणि ओडिशाला जलमय केलेल्या यास चक्रीवादळाने बिहार आणि झारखंडलाही तडाखा दिला आहे. या दोन्ही राज्यांमध्ये जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस कोसळला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बंगाल आणि ओडिशाचा दौरा करून बाधित भागांची पाहणी करणार आहेत. PM Modi will review cyclone situation today
दोन्ही राज्यांत मिळून २० लाखांपेक्षा जास्त लोकांना त्याचा फटका बसला आहे. पाऊस आणि घरे पडल्याने ओडिशातील तिघांचा, तर बंगालमधील एकाचा मृत्यू झाला. ‘यास’ने बुधवारी रात्री एकच्या सुमारास पश्चि्म सिंगभूमच्या मार्गाने झारखंडमध्ये प्रवेश केला. त्यामुळे येथे जोरदार पाऊस कोसळून रस्ते जलमय झाले.
राज्यात शुक्रवार (ता.२८) पर्यंत पाऊस पडेल, असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. चक्रीवादळ दक्षिण झारखंडला पोचल्यानंतर वादळ कमजोर झाले आणि कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. या वादळाने पश्चिदम बंगाल व ओडिशात मोठे नुकसान केले. वेगवान वाऱ्यांमुळे अनेक झाडे व विजेचे खांब पडले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App