विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींची पदवी खोटी असल्याचा दावा करणाऱ्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाने झटका दिला आहे. त्यांच्याविरुद्ध गुजरात युनिव्हर्सिटीने दाखल केलेला बदनामीचा खटला स्थगित करायला सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. PM degree row: SC rejects Delhi CM’s plea against HC order trashing his request to stay defamation case by Gujarat University
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यशास्त्र विषयात एम ए पदवी मिळवली आहे. मात्र ही पदवी खोटी असल्याचा दावा अरविंद केजरीवालांनी सार्वजनिकरित्या केला होता. गुजरात युनिव्हर्सिटीतून अभ्यासक्रम पूर्ण करून ही पदवी नरेंद्र मोदींनी मिळवली आहे.
मात्र नरेंद्र मोदींची ही पदवी खोटी असल्याचा दावा केल्यानंतर गुजरात युनिव्हर्सिटीने अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध बदनामीचा खटला दाखल केला. या बदनामीच्या खटल्यास स्थगिती द्यावी, अशी याचिका अरविंद केजरीवाल यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. मात्र ही याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली. त्यामुळे केजरीवाल यांच्याविरुद्ध बदनामीचा खटला चालणार असून त्या खटल्याला केजरीवाल्यांना सामोरे जावेच लागेल, असे स्पष्ट झाले आहे
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more