विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशभरात पेट्रोल व डिझेलच्या किमतींनी नव्या उच्चांकांना स्पर्श केला आहे. देशभरात पेट्रोल ३५ पैसे प्रतिलिटर; तर डिझेल ९ पैशांनी महाग झाले. देशात बहुतांश ठिकाणी पेट्रोलच्या प्रतिलिटर दराने १०० चा आकडा पार केला आहे. महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगण, कर्नाटक, जम्मू आणि काश्मीर, ओडिशा, तमिळनाडू, केरळ, बिहार, पंजाब, लडाख, सिक्कीम, पुदुच्चेरी या राज्यांत इंधनांच्या दरांनी शंभरी ओलांडली आहे. Petrol prices risen
पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांदरम्यान पेट्रोल, डिझेलच्या दरावर सरकारने नियंत्रण आणले होते; मात्र ही निवडणूक संपताच ४ मेपासून आतापर्यंत पेट्रोलच्या दरात तब्बल ३७ वेळा वाढ करण्यात आली आहे. या काळात पेट्रोल १०.१६ रुपये प्रति लिटरने; तर डिझेलचे दर ८.८९ रुपयांनी वाढले आहेत.
मुंबईत पेट्रोलचा दर १००.५६ रुपये प्रतिलिटर; तर दिल्लीत हा दर १०६.५९ रुपये आहे. डिझेलचे मुंबईत प्रतिलिटर दर ९७.१८ रुपये असून दिल्लीत ८९.६२ रुपये दर आहेत. सरकारी तेल कंपन्यांकडून तेल व नैसर्गिक वायूच्या उत्पादनात मागणीच्या तुलनेत वाढ होत नसल्याने भारताचे इतर देशांवरील अवलंबित्व वाढत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App