विशेष प्रतिनिधी
हैदराबाद : स्वदेशी बनावटीची लस असणाऱ्या कोव्हॅक्सिनची निर्मिती करणाऱ्या भारत बायोटेक आणि ब्राझील सरकार यांच्यातील कोरोनाप्रतिबंधक लसीच्या खरेदीच्या अनुषंगाने झालेल्या कराराला मोठा ब्रेक लागला आहे.Brazil cancels order from Bharat Biotech
ब्राझील सरकारने कथित अनियमिततेचा ठपका ठेवताना दोन कोटी डोसच्या ऑर्डरला तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे कंपनीने मात्र ब्राझीलकडून कोणत्याही प्रकारची आगाऊ रक्कम आम्हाला मिळाली नसल्याचे म्हटले आहे.
दक्षिण अमेरिकेच्या ॲटर्नी जनरलनी या लसीच्या पुरवठ्याच्या अनुषंगाने झालेल्या कराराच्या तपासणीचे आदेश दिले होते. यानंतर भारत बायोटेक आणि ब्राझीलमध्ये झालेल्या कराराला ब्रेक लागला होता.
जगभरातील अन्य देशांशी लसीच्या पुरवठ्याच्या अनुषंगाने करार करताना ज्या बाबींचा गांभीर्याने विचार करण्यात आला होता त्याचबाबी या करारादरम्यान देखील पाळण्यात आल्या असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.
यामध्ये कंत्राट, नियामक व्यवस्थेची मान्यता आणि पुरवठ्याच्या अनुषंगाने निश्चिरत केलेल्या बाबींचाही समावेश आहे. या प्रकाराची आरोग्य मंत्रालयाच्या प्रमाणीकरण समितीकडून देखील सखोल चौकशी करण्यात येणार आहे. ब्राझीलमध्ये ४ जून रोजी कोव्हॅक्सिनच्या आपत्कालीन वापराला मंजुरी मिळाली होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App