कोरोनाच्या पहिल्या लाटेचा गरीब महिलांना फटका


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोनाच्या संसर्गाचा सर्वाधिक फटका हा गरीब भारतीय महिलांना बसला असून त्यांना नोकरी तर गमवावी लागलीच पण त्याचबरोबर त्यांचे जेवण देखील तुलनेने घटल्याचा धक्कादायक निष्कर्ष डॅल्बर्ग कन्सल्टिंग फर्मने केलेल्या संशोधनातून पुढे आला आहे.corona impacts on poor woman’s

भटक्या जमाती आणि मुस्लिम समाजातील महिलांना याचा जबरदस्त तडाखा बसला असून विभक्त आणि घटस्फोटित महिलांनाही याची मोठी किंमत मोजावी लागल्याचे उघड झाले आहे.



कामाच्या आघाडीवर पुरुषांवर मात्र फारसा ताण आलेला दिसत नाही. कोरोना काळामध्ये महिलांचे आरोग्य आणि रोजगारावर नेमका काय परिणाम झाला? याचा वेध घेण्यासाठी हे संशोधन करण्यात आले होते.

कोरोना संसर्गाची पहिली लाट संपुष्टात आली असताना या महिलांना पुन्हा नव्याने रोजगार मिळणे अवघड झाले आहे. मागील वर्षी मार्च ते ऑक्टोबर या काळात या अनुषंगाने पाहणी करण्यात आली होती. देशातील दहा राज्यांतील कमी उत्पन्न गटातील पंधरा हजार महिला आणि २ हजार ३०० पुरुषांची मते जाणून घेण्यात आली होती.

corona impacts on poor woman’s

विशेष प्रतिनिधी

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात