Fuel price hike : राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पेट्राेलची शंभरी पार; इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात पेट्रोलचे दर प्रति लिटर 100 रुपयांवर गेले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. मे महिन्यांपासून ही दरवाढ सातत्याने केली जात आहे. Fuel price hike after a day’s break, petrol now surpasses 100 in all districts of Maharashtra

पेट्राेल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे २८ आणि ३० पैसे प्रति लिटर एवढी वाढ केली आहे. त्यामुळे इंधनाचे दर पुन्हा उच्चांकी पातळीवर पाेचले आहेत. मुंबईत पेट्राेलचे दर १०२ रुपये, तर दिल्लीत ९५.८५ रुपये प्रति लिटर झाले. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये पेट्राेलने शंभरी पार केली आहे.

पेट्राेल आणि डिझेलची दरवाढ सरकारी तेल कंपन्यांकडून सुरू आहे. ४ मेपासून २३ वेळा इंधन दरवाढ केली आहे.  जूनमध्येच पेट्राेल आणि डिझेलच्या किमती अनुक्रमे १.३५ आणि १.३९ रुपयांनी वाढल्या आहेत.

पेट्राेलचे दर चेन्नईत ९७.१९ रुपये तर काेलकाता येथे ९५.८० रुपये प्रति लिटर झाले. एक लिटर डिझेलचे दर मुंबईत ९४.१५ रुपये तर दिल्लीत ८६.७५ रुपयांवर पाेचले. चेन्नई येथे डिझेलचे दर ९१.४२ तर काेलकाता येथे ८९.६० रुपये प्रति लिटरवर पाेचले.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल ७२ डॉलर्सवर

  • आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची माेठी दरवाढ झाली आहे. कच्च्या तेलाचे दर शुक्रवारी ७२ डाॅलर्स प्रति बॅरल एवढे हाेते. परिणामी, भारतात इंधनाची दरवाढ झाली आहे.
  • याशिवाय केंद्र आणि राज्यांच्या करांचाही वाटा माेठा असल्याने सर्वसामान्यांचे इंधन दरवाढीमुळे कंबरडे माेडले.

Fuel price hike after a day’s break, petrol now surpasses 100 in all districts of Maharashtra

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात