‘आरटीओ’मध्ये चालकाला आता वाहन चाचणी न देताच मिळणार ‘लायसन्स’


वृत्तसंस्था

मुंबई : आरटीओत वाहन चाचणी न देताच चालकाला लायसन्स मिळणे शक्य होणार आहे. रस्ते वाहतूक मंत्रालयाने याबाबत अधिसूचना काढली आहे.
Rto Driver License Establishment Of Updated Driver Training Center By The Ministry Of Road Transport

एखादी संस्था, कंपनी, कंत्राटदारांना नवीन चालक प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यासाठी अटी व शर्तींचे पालन करावे लागणार आहे. यामधून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या चालकाला प्रमाणपत्र मिळेल आणि ते सादर केल्यानंतर आरटीओकडून थेट लायसन्स मिळणार आहे. कुशल वाहनचालक मिळावेत आणि अपघातही कमी व्हावे हा त्यामागचा प्रमुख उद्देश आहे.

सध्या मोटर ड्रायव्हिंग स्कूलमध्ये चालकाला २१ दिवसांचे प्रशिक्षण दिले जाते. यातून बाहेर पडलेला चालक आरटीओत प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र सादर करतो. त्यानंतर सर्व कागदपत्र पूर्ततेनंतर आरटीओकडून त्याची चाचणी घेतली जाते व त्यानंतर लायसन्स मिळते. पक्के लायसन्स मिळवण्याआधी शिकाऊ लायसन्स गरजेचे असते. परंतु यातून कु शल चालक मिळतीलच, असे नाही.



त्यामुळे रस्ते वाहतूक मंत्रालयाने अद्ययावत असे चालक प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्याची मसुदा अधिसूचना फे ब्रुवारी २०२० मध्ये जारी के ली होती. त्याची अंतिम अधिसूचना ७ जून २०२१ ला रस्ते वाहतूक मंत्रालयाने जारी केली आहे.
अद्ययावत चालक प्रशिक्षण केंद्र उभे राहिल्यानंतर आरटीओकडील अधिकार मात्र कमी होणार आहेत. आरटीओकडून फक्त चालकाला कायमस्वरुपी लायसन्स देण्याचा अधिकार राहिल. वाहन चाचणी घेता येणार नाही.

केंद्रासाठीच्या अटी…

  • केंद्राच्या अधिसूचनेनुसार चालक प्रशिक्षण केंद्र हे एक किंवा दोन एकर जागेत हवे.
  • प्रथम वाहतूक नियम शिकवण्याची साधने हवीत. अवजड आणि हलके  वाहन आभासी प्रशिक्षण चाचणी यंत्रणा, स्वतंत्र वाहन चाचणी पथ, संगणक, इत्यादी सुविधा या केंद्रात असणे गरजेचे आहे.
  • या केंद्रातून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या चालकाला आरटीओत पुन्हा चाचणी देण्याची गरज लागणार नाही.
  • १ जुलै २०२१ पासून अद्ययावत वाहन चालक प्रशिक्षण केंद्र उभारणीसाठी अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

Rto Driver License Establishment Of Updated Driver Training Center By The Ministry Of Road Transport

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात