विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : ऑलिंपिकचा आठवा दिवस भारतासाठी आनंदाच्या बातम्या घेऊन आला. तमाम भारताची “पिस्तुल क्वीन” मनू भाकर (Manu bhakar ) ऐतिहासिक ऑलिंपिक पदकाच्या हॅट्ट्रिकच्या उंबरठ्यावर पोहोचली, तर हॉकीत ऑलिंपिक मध्ये भारताने ऑस्ट्रेलियावर 1972 नंतर 52 वर्षांनी मात केली.
मनू भाकरने आधीच पॅरिस ऑलिंपिक मध्ये 2 ब्राँझ पदके मिळवून इतिहास रचलाच आहे. तिने आज 25 मीटर पिस्टल निशाणेबाजीत 580 गुण मिळवून दुसरा क्रमांक पटकावत अंतिम फेरीत धडक मारली. त्यामुळे तिची पदक निश्चिती झाली. उद्या दुपारी 1.00 वाजता मनू अंतिम फेरीत खेळून तिसरः ऑलिंपिक पदक मिळवून आणखी मोठा इतिहास रचेल.
– हॉकीत ऑस्ट्रेलियावर मात
भारताने धडाकेबाज सुरुवात करत ऑस्ट्रेलियाला पहिल्याच सत्रात एकामागून एक धक्के दिले होते. त्यामुळे भारत यावेळी विजय मिळवेल, असे वाटत होते. पण ऑस्ट्रेलियाने २५ व्या मिनिटाला गोल केला. त्यामुळे भारताच्या गोटात थोडे चिंतेचे वातावरण होते. पण भारताचा कर्णधार हरमनप्रीत सिंगने तिसरा गोल केला आणि त्यामुळे भारताला ३-१ अशी आघाडी मिळवता आली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने अजून एक गोल केला. पण भारताकडे ३-२ अशी आघाडी होती. भारताने ऑस्ट्रेलियावर ३-२ असा विजय साकारला आणि आपल्या गटात दुसरे स्थान मिळवले. त्यामुळे आता भारताला बाद फेरीत ग्रेट ब्रिटनचा सामना करावा लागू शकतो. पण हे समीकरण शुक्रवारी रात्री स्पष्ट होणार आहे.
भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात झोकात सुरुवात केली. पहिल्या १० मिनिटांत दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले होते. पण ११ वे मिनिट भारतासाठी सर्वात महत्वाचे ठरले. कारण ११ व्या मिनिटाला भारताने जोरदार आक्रमण केले. या आक्रमणाचा चांगलाच फायदा भारताला यावेळी झाला. कारण भारताच्या अभिषेकने यावेळी १२ व्या मिनिटाला गोल केला आणि भारताला पहिले यश मिळाले. पण भारत यावर थांबला नाही. कारण त्यानंतर पुढच्याच मिनिटाला भारताला अजून एक संधी मिळाली होती.
सामन्याच्या १३ व्या मिनिटाला भारताला गोल करण्यासाठी अजून एक चांगली संधी मिळाली. कारण भारताला सामन्याच्या १३ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला होता. भारताला गोल करण्यासाठी ही एक चांगली संधी होती. या संधीचे सोने केले ते भारताचा कर्णधार हरमनप्रीत सिंगने. हरमनप्रीतने यावेळी पेनल्टी कॉर्नरवर गोल केला आणि भारताला दुसरे यश मिळवून दिले. त्यामुळे पहिल्या सत्रात भारताकडे २-० अशी दमदार आघाडी होती. पण दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा संघ शांत बसणारा नक्कीच नव्हता.
सामन्याच्या दुसऱ्या सत्रात ऑस्ट्रेलियाचा संघ चांगलाच आक्रमक झाला होता आणि ते पहिल्या गोलच्या शोधात होते. यावेळी सामन्याच्या २५ व्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाला गोल करण्याची संधी मिळाली. भारताच्या मनप्रीतने यावेळी चांगला बचाव केला, पण त्यानंतर चेंडू पुन्हा ऑस्ट्रेलियाकडे गेला. ऑस्ट्रेलियाने या गोष्टी चांगलाच फायदा उचलला आणि त्यांनी पहिला गोल केला. त्यामुळे भारताची आघाडी कमी झाली. भारताकडे आता २-१ अशी आघाडी कायम होती.
या सामन्यात मध्यंतरापर्यंत भारताकडे २-१ अशी आघाडी होती. त्यामुळे आता तिसऱ्या आणि चौथ्या सत्रात नेमका कसा खेळ होतो, यावर सामन्याचा निकाल ठरणार होता. सामन्याच्या ३२ व्या मिनिटाला हरमनप्रीतने अजून एक गोल केला आणि त्यामुळे भारताला ३-१ अशी आघाडी मिळवता आली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App