वृत्तसंस्था
नवी दिल्ली : ‘ओमायक्रॉन’ विषाणूचे दोन रुग्ण कर्नाटकात आढळल्याने घबराट उडाली असून नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. Panic over finding two patients with Omycron in Karnataka; Central government advises citizens to abide by Corona rules
‘ओमायक्रॉन’चे दोन्ही रुग्ण पुरुष आहेत. त्यांचे वय ६६ आणि ४६ वर्षे आहे. दोन्ही रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेण्यात यश आले आहे. त्यांच्या चाचण्या करण्यात येत आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी सांगितले.लोकांनी कोरोना प्रतिबंधांचे नियम पाळावेत आणि लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले. जागरूक राहणे आवश्यक आहे. नियमांचे पालन करावे आणि गर्दीत जाणे टाळावे. संपूर्ण लसीकरण करण्यात दिरंगाई करू नये, असे आवाहन केंद्रीय अधिकाऱ्यांनी केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App