वृत्तसंस्था
नवी दिल्ली : आत्मनिर्भर भारत योजनेत भारतीय नौदलाने देखील अतुलनीय योगदान दिले असून 39 युद्धनौकांना पैकी 37 युद्धनौका आणि आणि पाणबुड्या यांची निर्मिती भारतातल्या विविध डॉकयार्डमध्ये करण्यात आली आहे, अशी महत्वपूर्ण माहिती नवे नौदल प्रमुख एडमिरल हरि कुमार यांनी दिली आहे. Atmanirbhar bharat; Indian Navy contributed a lot, most war ships are made in India
भारताच्या उत्तर सीमेवर निर्माण झालेला तणाव आणि कोरोनाच्या लाटा यामुळे जी मोठी आव्हाने निर्माण झाली आहेत, त्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी नौदलाने पूर्ण तयारी केली आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी नौदलाच्या वैद्यकीय विभागाने किनारपट्टी भागात अनेक ठिकाणी स्थानिक प्रशासनाला सहकार्य करत कोविड सेंटर्स देखील उभारली आहेत, याची माहिती ॲडमिरल हरि कुमार यांनी दिली आहे.
आत्मनिर्भर भारत योजनेत यापुढे देखील नौदलाचे योगदान अधिक राहील. नौदलाला आवश्यक असणारी सर्व सामग्री भारतातच निर्मित केली जाईल. आवश्यक ती आर्थिक आणि तांत्रिक गुंतवणूक तसेच तंत्रज्ञान अपडेट करण्यासाठी लागणारे मनुष्यबळ यासाठी मोठी गुंतवणूक नौदल करणार आहे. येत्या पाच वर्षांमध्ये भारतीय नौदलाला तंत्रज्ञान दृष्ट्या देखील आत्मनिर्भर करण्याचे आमचे प्रयत्न आहेत, असे ॲडमिरल हरि कुमार म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more