विरोधक “अडकले” लखीमपूर खीरीत; गांधीनगर महापालिकेत भाजप तेजीत!!; भाजप 40 काँग्रेस 3, आप भुईसपाट!!


वृत्तसंस्था

गांधीनगर : उत्तर प्रदेशात लखीमपूर खीरी हिंसाचारावरून राजकारणात गदारोळ माजला असताना गुजरात मध्ये गांधीनगर महापालिकेत मात्र भाजपने काँग्रेसचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे. गांधीनगर महापालिकेच्या 11 वॉर्डमधील 44 जागांपैकी 40 जागा भाजप उमेदवारांनी जिंकल्या असून काँग्रेसला 3 जागी, तर आम आदमी पक्षाला एका जागी विजय मिळाला आहे. Opposition “stuck” in Lakhimpur Khiri; BJP rises in Gandhinagar Municipal Corporation !!; BJP 40 Congress 3, you are flat !!

गुजरात मधल्या सुरत महापालिकेमध्ये तब्बल 27 जागा जिंकून अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने राज्यात स्वतःची मोठी हवा केली होती. पण विधानसभेच्या निवडणुका 11 महिने दूर असताना त्याआधीच गांधीनगरच्या महापालिका निवडणुकीत आम आदमी पार्टीने निर्माण केलेली हवा निघून गेली आहे. काँग्रेसने देखील स्वतंत्रपणे 44 उमेदवार उभे केले होते. त्यापैकी फक्त तीन उमेदवारांना यश मिळू शकले. 40 जागांवर भाजपने विजय मिळवला.



गुजरात मध्ये विजय रुपाणी यांना राजीनामा द्यायला लावून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने भूपेंद्र पटेल यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा सोपवल्या नंतर गांधीनगर महापालिकेची निवडणूक झाली. या पहिल्याच निवडणुकीत पटेल सरकारने बाजी मारल्याचे स्पष्ट झाले.

या निवडणुकीपूर्वी काँग्रेसने देखील गुजरात मध्ये एक महत्त्वाची राजकीय खेळी केली होती. जिग्नेश मेवाणी या तरुण विद्यार्थी नेत्याला आपल्या गोटात आणले होते. परंतु, गांधीनगर महापालिकेत काँग्रेसला फक्त तीन जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे निवडणुकीच्या दृष्टीने त्याचा फारसा फायदा झालेला नसल्याचे स्पष्ट होत आहे.

Opposition “stuck” in Lakhimpur Khiri; BJP rises in Gandhinagar Municipal Corporation !!; BJP 40 Congress 3, you are flat !!

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात