विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यावरून विरोधी पक्षांनी बुधवारी गृहमंत्री अमित शाह यांच्यावर हल्लाबोल केला.Opposition parties attacked Amit Shahs statement against Nehru BJP also responded
ब्रिटिश राजवटीविरुद्ध लढणाऱ्या आणि स्वातंत्र्यलढ्यासाठी सर्वस्व पणाला लावणाऱ्यांचा अपमान करण्याचा अधिकार कोणालाही नाही, असे काँग्रेस नेत्यांनी सांगितले.
तर, भाजप नेत्यांनी लोकसभेत अमित शाह नेहरूंबद्दल जे काही बोलले ते खरे होते आणि इतिहास सांगावा लागेल असे म्हणत पलटवार केला.
तर ”नेहरूंच्या काळात झालेल्या चुकांचा फटका काश्मीरला वर्षानुवर्षे सहन करावा लागला. पहिली आणि सर्वात मोठी चूक- जेव्हा आपले सैन्य जिंकत होतं, मात्र पंजाबचं क्षेत्र येताच युद्धविराम(सीजफायर) लागू करण्यात आला आणि पीओकेचा जन्म झाला. जर तीन दिवसानंतर युद्धविराम केला गेला असता, तर आज पीओके भारताचा भाग असला असता. याचबरोबर दूसरी चूक म्हणजे भारताचा अंतर्गत मुद्दा संयुक्त राष्ट्रात घेऊन जाणे ही होती.” असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी लोकसभेत सांगितले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App