मोदी नावाच्या आगे मागे “आदरणीय” आणि “जी” लावू नका, त्यामुळे “अंतर” वाढते; पंतप्रधान मोदींची खासदारांना सूचना!!


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशातल्या तीन राज्यांमध्ये दणदणीत विजय मिळवून संसदीय पक्षाच्या बैठकीत पोहोचलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज खासदारांना एक नवी अनोखी सूचना केली. आपल्याला देश “मोदी” या नावानेच ओळखतो, त्यामुळे आपल्या नावाच्या आगे मागे “आदरणीय” आणि “जी” ही विशेषणे लावू नका त्यामुळे आपल्यातले “अंतर” वाढते आणि ते मला नको आहे, अशा शब्दांत मोदींनी खासदारांना आपल्याला फक्त “मोदी” म्हणा, अशी सूचना केली. Dont say aadarniya Modiji PM Narendra Modi tells BJP MPs at parliamentary party meeting

तीन राज्यांमधल्या जबरदस्त विजयानंतर संसदेचे अधिवेशन सुरू झाले. या पार्श्वभूमीवर भाजप संसदीय पक्षाची बैठक आज झाली. या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. आपल्या संबोधनात मोदींनी खासदारांनी पाळावयाच्या काही गोष्टी अधोरेखित करून सांगितल्या. केंद्रातल्या जनकल्याण योजना आपापल्या मतदारसंघातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत जबाबदारीने पोचविण्याची सूचना मोदींनी केली.

त्याचबरोबर स्वतःच्या नावाविषयी त्यांनी विशेष टिप्पणी केली. पंतप्रधान मोदी म्हणाले, की देशात सगळेजण मला फक्त “मोदी” या नावाने ओळखतात. ते मला आपल्या कुटुंबातला एक सदस्य मानतात. त्यामुळे आपण सर्वांनी माझ्या नावाच्या आगे मागे “आदरणीय” आणि “जी” हे प्रत्यय लावू नयेत. आदरणीय मोदीजी म्हटल्याने आपल्यातले “अंतर” वाढते. वास्तविक एक खासदार म्हणून मी देखील तुमच्यातलाच एक आहे आणि केवळ “मोदी” म्हटल्याने हे “अंतर” कमी होईल आणि तुम्हाला मी तुमच्यातलाच एक वाटेन!!

पंतप्रधान मोदींच्या या संबोधनानंतर अनेक खासदारांनी मोदींच्या या नम्रतेचे विशेष कौतुक केले. पंतप्रधानांच्या सूचनेनुसार आपण केंद्रातल्या विविध जनकल्याण योजना जनतेपर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात पोहोचवण्याचे प्रयत्न करण्याची ग्वाही खासदारांनी दिली.

Dont say aadarniya Modiji PM Narendra Modi tells BJP MPs at parliamentary party meeting

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात