तीन राज्यांमधील भाजपचा विजय मोदींनी केला कार्यकर्त्यांना समर्पित!

  • भाजपच्या संसदीय बैठकीत केलं विधान, जाणून घ्या नेमकं काय म्हणाले?

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : न राज्यांतील भाजपाचा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांना समर्पित केला आहे. तीन राज्यांमध्ये पक्षाला मिळालेला विजय कार्यकर्त्यांना समर्पित असल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. गुरुवारी (7 डिसेंबर) भाजपच्या संसदीय बैठकीत पंतप्रधान मोदींनी हे विधान केलं. तीन राज्यांतील विजयानंतर झालेल्या या बैठकीत पंतप्रधान मोदींचे जंगी स्वागत करण्यात आले. या बैठकीला भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह पक्षाचे सर्व बडे नेते उपस्थित होते.Modi dedicated BJPs victory in three states to party workers



भाजप नेते आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, हा विजय कार्यकर्त्यांना समर्पित आहे. राज्यातील सर्व कार्यकर्त्यांनी योगदान दिले आहे. त्यांनी शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवल्या आहेत. संसदीय बैठकीत मोदींनी विकसित भारत मोहिमेवरही चर्चा केली. महिलांना ड्रोन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्याचा त्यांना फायदा झाला पाहिजे, असे ते म्हणाले. सरकारमध्ये असताना विजयाची टक्केवारी खूपच चांगली असल्याचेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

तीन राज्यांतील विजय हा सांघिक भावनेचा विजय असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. सर्वांच्या मेहनतीमुळे हा विजय मिळाला आहे. हे केवळ एका व्यक्तीचे कष्ट नाही. सर्वांच्या मेहनतीमुळेच हा विजय मिळाला आहे. त्यामुळे सर्वांनी आनंद व्यक्त केला पाहिजे. आपण जातींमध्ये विभागले जाऊ नये. आपली जात तरुणांची आहे, आपली जात महिलांची आहे, आपली जात गरीबांची आहे, आपली जात शेतकऱ्यांची आहे. असंही मोदींनी यावेळी बोलून दाखवलं.

Modi dedicated BJPs victory in three states to party workers

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात