विरोधकांची राजकीय (कु)बुद्धी : आधी संसदेवरचे सिंह दिसले “हिंस्र”; आता असंसदीय शब्दांसाठी “आग्रह”!!

विनायक ढेरे

देशात सत्ताधारी भाजप संपूर्ण राजकारण व्यापून आणि ग्रासून टाकत असताना विरोधक मात्र किती राजकीय दिवाळखोर वैचारिक बुद्धीने काम करताहेत याचे प्रत्यंतर आजही आले आहे!! Opposition parties are engaged in meaningless controversies of central vista lions and unparliamentary words as BJP plans more big things

संसदेचे अधिवेशन 18 जुलैपासून सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर संसदेत वापरण्यात येणाऱ्या असंसदीय शब्दांवर प्रतिबंध घालण्याची योजना लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी आखली. तशी पुस्तिकाही प्रसिद्ध केली. त्यात विशिष्ट शब्द असंसरीय ठरविले आहेत. त्याची यादी देखील त्यामध्ये दिली आहे. परंतु त्या मुद्द्यावर सर्व विरोधक उसळले आहेत. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते खासदार जयराम रमेश, तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओबेरायन, महुआ मोईत्रा, शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी, खासदार राहुल गांधी या सर्वांनी असंसदीय शब्द बॅन का केले??, असा सवाल ओम बिर्ला यांना नव्हे, तर मोदी सरकारला केला आहे. असंसदीय शब्दांची यादी प्रसिद्ध करून मोदींनी सभ्यतेचे संकेत दिले नाहीत तर आपली भीतीच प्रकट केली आहे. कारण त्यांना आपल्यावरच्या टीकेची भीती वाटते, असे शरसंधान जयराम रमेश यांनी साधले आहे. थोड्याफार फरकाने बाकी सर्व नेत्यांनी याच पद्धतीने मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

भाजपची दीर्घसूत्री योजना

एकीकडे भाजप देशाचे संपूर्ण राजकारण व्यापून आणि ग्रासून टाकताना दिसत आहे. विविध योजना सरकारी पातळीवर अमलात आणत आहे. संघटनेची बांधणी मजबूत करताना दिसत आहे आणि दुसरीकडे अशा बलाढ्य भाजपची टक्कर घेताना विरोधक मात्र संसदेवरच्या सिंहाच्या पुतळ्यामधला हिंस्र भाव आणि नंतर संसदेत वापरण्यात येणारे असंसदीय शब्द या तुलनेने निरर्थक मुद्द्यांवर वाद घालत बसले आहेत!! सेंट्रल व्हिस्टावरील सिंह हिंसक दिसतात. अशोक स्तंभावरचे सिंह शांत धीर गंभीर दिसतात, हे “अतिगंभीर” मुद्दे विरोधकांनी उपस्थित करून त्यावर वाद घातला… तो वाद अजून राजकीय हवेत फिरत असतानाच “असंसदीय शब्द” या विषयांवरून विरोधक आक्रमक झाले आहेत.

विरोधकांची आंदोलने फक्त सोशल मीडियावर

एरवी विरोधक देशातल्या महागाई बेरोजगारी या मुद्द्यांवरून अधून मधून ट्विटर फेसबुक वर आंदोलने करत असतात कधी मधी रस्त्यावर चुली पेटवतात. पण त्या पलिकडे त्यांचे आंदोलने जात नाहीत. अशा स्थितीत जनतेचा विश्वास कमावण्यासाठी आणि आपली राजकीय पुनर्स्थापना करण्यासाठी त्यांनी कोणत्या दर्जाचे बौद्धिक मुद्दे उचलले आहेत हे सेंट्रल व्हिस्टावरचे हिंस्र सिंह आणि आता संसदीय शब्दांची डिक्शनरी यावरून कळते वास्तविक जे शब्द असंसदीय या शब्दांच्या यादीत समाविष्ट केले आहेत ते राजस्थान, छत्तीसगड आणि झारखंड या विधानसभांनी आधीच बॅन केलेले शब्द आहेत. या तीनही राज्यांमध्ये काँग्रेसची सरकारे आहेत ही बाब येथे अधोरेखित केली पाहिजे.

 हेच ते असंसरीय शब्द

भ्रष्ट, पाखंड, जुमलाजीवी, घड़ियाली आंसू , जयचंद, गद्दार, शकुनी, शर्मिंदा, धोखा, नाटक, पाखंड, ‘लॉलीपॉप, चाण्डाल चौकड़ी, अक्षम, गुल खिलाए, पिठ्ठू, कमीना, काला सत्र, दलाल, खून की खेती, चिलम लेना, छोकरा, कोयला चोर, गोरू चोर, चरस पीते हैं, सांड

याखेरीज काही वाक्प्रचार बंदी घातली आहे.
आप मेरा समय खराब कर रहे हैं, आप हम लोगों का गला घोंट दीजिए, चेयर को कमजोर कर दिया है और यह चेयर अपने सदस्यों का संरक्षण नहीं कर पा रही

बॉब कट हेयर, गरियाना, अंट-शंट, उच्चके, उल्टा चोर कोतवाल को डांटे, कांव-कांव करना, तलवे चाटना, तड़ीपार, तुर्रम खां तथा झारखंड विधानसभा में अससंदीय घोषित ‘कई घाट का पानी पीना’, ठेंगा दिखाने का कारवाई हे वाक्प्रचार देखील बंदी खाली आले आहेत.

मात्र या सर्वच बाबींवर आता वर उल्लेख केल्याप्रमाणे राहुल गांधी, जयराम रमेश प्रियंका चतुर्वेदी, डेरेक ओब्रायन, महुआ मोईत्रा आदी खासदारांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. हे हे शब्द असंसदीय ठरवून वगळले तर आम्ही मोदी सरकारवर टीका तरी कशी करायची?? असा सवाल या सर्वच नेत्यांनी केला आहे. डेरेकर यांनी तर मी असंख्य शब्द वापरणार मला निलंबित करायचे तर करा असे आव्हानच दिले आहे.

विरोधकांची राजकीय उंची तोकडी

पण याचा अर्थ शब्द असंसदीय शब्द वापरल्याशिवाय मोदी सरकारला घेरताच येणार नाही, सरकारवर गंभीर मुद्द्यांवर टीकाच करता येणार नाही, असाही होऊ शकतो याचे भान देखील विरोधकांना राहिलेले दिसत नाही!! एकीकडे मोदी सरकार नवीन संसद बांधत आहेत हिवाळी अधिवेशन नवीन संसदेत घेण्याची योजना आहे. देशाला पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती मिळणार आहेत. त्याचे सेलिब्रेशन तब्बल 1.45 लाख आदिवासी गावांमध्ये भव्य दिव्य करण्याची योजना आहे. अशा योजनांना बिनतोड युक्तिवादाने अथवा प्रत्यक्ष राजकीय कृतीने उत्तर देण्याऐवजी विरोधक सिंहाच्या पुतळ्यामधील हिंसा आणि असंसदीय शब्दांचा आग्रह या विषयावर वाद घालत बसले आहेत. यातच त्यांची राजकीय बुद्धीची “उंची” दिसून येते!!

Opposition parties are engaged in meaningless controversies of central vista lions and unparliamentary words as BJP plans more big things

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात