हमीद अन्सारींचे प्रत्युत्तर : नुसरत मिर्झाला ना मी बोलवले, ना मी त्यांच्याशी बोललो; भाजपकडून चुकीचे आरोप!!


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पाकिस्तानी पत्रकार नुसरत मिर्झा यांनी उपस्थित केलेल्या काही मुद्द्यांवरून भारतात जे वादळ निर्माण झाले आहे, त्या मुद्द्यावर माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. Ex-VP & Congress leader Hamid Ansari issues a statement regarding Pak journalist Nusrat Mirza

पाकिस्तानी पत्रकार नुसरत मिर्झाला ना मी बोलवले, ना मी कधी त्यांच्याशी बोललो. दहशतवादाशी संबंधित असलेल्या परिसंवादाचे उद्घाटन मी जरूर केले. परंतु या संदर्भातली सर्व माहिती सरकार कडे पूर्णपणे उपलब्ध आहे. तेच नुसरत मिर्झा – आयएसआय कनेक्शन याबाबत खुलासा करू शकतील, असे स्पष्टीकरण हमीद अन्सार यांनी केले आहे.

पाकिस्तानी पत्रकार नुसरत मिर्झा यांनी एका टीव्ही इंटरव्यू मध्ये आपण भारतामध्ये सात वेळा गेलो आणि भारतातली माहिती गोळा करून पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआयला दिली. यापैकी एकावेळी आपल्याला प्रत्यक्ष उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी निमंत्रित केले होते, असा दावा केला होता. त्यावरून भारतात मोठे वादळ उठले आहे हमीद अन्सारी यांच्यावर सोशल मीडियातून जोरदार शरसंधान साधले गेले आहे. भाजपच्या प्रवक्त्यांनी हमीद अन्सारी यांच्या देशभक्तीच्या मुद्द्यावर प्रश्नचिन्ह लावले आहे.

या सर्व मुद्द्यांवर हमीद अन्सार यांनी आपले बाजू मांडणारे पत्रक प्रसिद्ध केले आहे. नुसरत मिर्झा यांना कधी भेटल्याचा अथवा त्यांना निमंत्रित केल्याचा हमीद अन्सारी यांनी पूर्णपणे इन्कार केला आहे. दहशतवादाशी संबंधित परिसंवादाचे उद्घाटन मी उपराष्ट्रपती या नात्याने केले. परंतु, त्याची सगळी निमंत्रणे त्यावेळच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाठवली होती. त्या निमंत्रणांशी उपराष्ट्रपती कार्यालयाशी काही संबंध नव्हता. त्या परिसंवादाच्या वेळी मी कोणालाही व्यक्तिगतरित्या भेटलो नव्हतो. त्यामुळे नुसरत मिर्झाला भेटण्याचा प्रश्नच नाही, असा खुलासा हमीद अन्सार यांनी केला आहे.

याखेरीज इराणमध्ये राजदूत असताना आपले सगळे काम रेकॉर्डवर उपलब्ध आहे. त्यावेळच्या परराष्ट्र मंत्रालयाशी आपला नियमित संपर्क होता. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने आपली नेमणूक संयुक्त राष्ट्रसंघात भारताचा कायमचा प्रतिनिधी म्हणून केली होती. त्या वेळचे कामही रेकॉर्डवर उपलब्ध आहे. यासंबंधी सर्व खुलासा परराष्ट्र मंत्रालय करू शकते, असेही हमीद अन्सारी यांनी काढलेल्या पत्रकात नमूद केले आहे.

Ex-VP & Congress leader Hamid Ansari issues a statement regarding Pak journalist Nusrat Mirza

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय