निवडणूक देशाची, पंतप्रधान निवडण्याची; पण बुडत्या विरोधकांना हौस स्थानिक अस्मितांच्या काड्यांवर तरंगण्याची!!

लोकसभेची निवडणूक ही संपूर्ण देशाची आहे. त्यातून कोणता पक्ष सत्ताधारी होऊन कोण पंतप्रधान होणार??, हा विषय सर्वाधिक चर्चेचा आहे. त्यासाठी भाजपने नरेंद्र मोदींचे नाव पुढे करत त्यांच्याच नावावर मते मागण्याचा उघड प्रयत्न चालवला आहे. त्या उलट मोदींचे सगळे विरोधक भाजपच्या डावपेचांना राष्ट्रीय पातळीवरून उत्तर देण्याऐवजी प्रादेशिक आणि स्थानिक मुद्दे आणि अस्मितांचे आधार घेतच त्यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करत आहेत. Opposition leaders trying to save their faces in the name of regional prides

पंतप्रधान मोदींच्या अबकी बार 400 पार याला विरोधकांकडे खरे उत्तरच नाही. विरोधक त्यातल्या त्यात 290 ते 300 च्या आकड्यांमध्ये खेळत आहेत. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हे तर काँग्रेस आणि इंडिया आघाडीला नेमक्या किती जागा मिळतील??, हे भाकीत करण्याचे धाडस देखील करत नाहीत. उलट भाजपच्या जागा 180 ते 150 एवढ्या कमी होतील, हे भाकीत करायला मात्र ते पुढे सरसावत आहेत.

सुप्रिया सुळेंना आठवली आजी

बाकीच्या प्रादेशिक पक्षांचे नेते तर आकड्याच्या फंदातच पडायला तयार नाहीत. कारण ते तेवढ्या जागाच लढवत नाहीत. शरद पवार हे “राष्ट्रीय” नेते आहेत, पण त्यांचा पक्ष फक्त 10 जागांवर निवडणूक लढवतोय आणि त्यांची प्रतिष्ठा फक्त बारामतीत सुप्रिया सुळे यांना निवडून आणण्याच्या कामी लागली आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे देखील तोंड देखली “राष्ट्रीय” स्वरूपाची भाषा वापरतात. अगदी ज्यांची सत्ता काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आहे, त्यांना शरद पवारांना संपवायला संपवण्याची भाषा करावी लागते, अशी टीका करतात, पण निवडून येण्यासाठी स्थानिक आधार मात्र आपल्या दिवंगत आजीचाच घेतात. आत्तापर्यंत सुप्रिया सुळे फक्त मी शरद पवार आणि प्रतिभा पवार यांची कन्या आहे, असे म्हणत असत. आई-वडिलांचे आणि यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार याची टिमकी त्या सतत वाजवत असत. पण आजच्या सभेत मात्र त्यांनी मी शारदाबाई पवारांची नात आहे. रडत बसणार नाही. लढणार, अशी घोषणा केली. बारामतीची निवडणूक पूर्ण गळ्याशी आल्यानंतर सुप्रिया सुळेंना आपली आजी आठवली.

खाने को केजरीवाल, भरने को दिल्लीवाले

दिल्लीत दारू घोटाळ्यात अरविंद केजरीवाल तुरुंगात गेले. ते डायबेटिसचे पेशंट आहेत. कुठलेही गोड पदार्थ खायला त्यांना प्रतिबंध आहे, पण तरी तुरुंगात ते आंबे आणि मिठाया खात आहेत. साखरेचा चहा घेत आहेत. याबद्दल ईडीने थेट कोर्टात तक्रार केल्यानंतर कोर्टाने दखल घेऊन त्यांचा डाएट प्लॅन मागवला. मात्र त्यावर दिल्लीच्या मंत्री अतिशय मार्लेना यांनी मखलाशी करत अरविंद केजरीवालांचा हा छळ दिल्लीची जनता सहन करणार नाही, अशी वक्तव्य करायला सुरुवात केली.

पण अरविंद केजरीवालांच्या दारू घोटाळ्याच्या मनी लॉन्ड्रीग मध्ये घोटाळ्यात दिल्लीची जनता अडकलेली नाही, केजरीवाल आणि त्यांचे मंत्री अडकलेत. तुरुंगात दिल्लीची जनता गेलेली नाही, केजरीवाल आणि त्यांचे मंत्री तुरुंगात गेलेत. दिल्लीची जनता तुरुंगात बसून आंबे किंवा मिठाया खात नाही, ते केजरीवाल खात आहेत. पण आतिशी मार्लेना यांच्यासारखे केजरीवालांचे मंत्री मात्र दिल्लीच्या जनतेच्या नावाने मखलाशी करत केजरीवालांच्या आंबे आणि मिठाई खाण्याचे समर्थन करत आहेत.

ओवैसींना आठवली हैदराबादी अस्मिता

हैदराबाद मध्ये माधवी लता यांनी असदुद्दीन ओवैसी यांच्यापुढे कडवे आव्हान उभे केल्यानंतर ओवेसींना देशात इतरत्र फिरण्यापेक्षा हैदराबाद मध्येच अडकून पडावे लागले आहे. कारण माधवी लतांचा संपर्क समाजातल्या सर्व घटकांमध्ये आहे. अगदी मुस्लिम महिलांमध्ये देखील त्यांचे काम आहे. त्यामुळे माधवी लतांवर ओवैसी यांना थेट हल्लाबोल करता येत नाही म्हणून ओवेसींनी हैदराबादी अस्मितेचा आधार घेत हैदराबादची जनता भाजपच्या कमळ चिन्हाला स्वीकारणार नाही असा धोषा लावला आहे. ओवैसी ज्या जुन्या हैदराबाद मतदारसंघात उभे राहून निवडून येतात, तिथे मुस्लिमांची मतदार संख्या 69 % असल्याचे सांगितले जाते, पण मुस्लिम मतांमध्ये फूट पडून आपला पराभव होईल, असे दिसताच हैदराबादी संस्कृती आणि अस्मिता आठवली आहे आणि हीच संस्कृती आणि अस्मिता कशी भाजप आणि कमळाविरोधात आहे, याचे “संकीर्तन” ओवेसींनी गायले आहे.

लोकसभेची ही निवडणूक संपूर्ण देशाची आहे. त्यातून देशात कोणता पक्ष सत्तेवर येईल आणि कोण पंतप्रधान होईल?? याची निवड जनतेने करणे अपेक्षित आहे. अशावेळी राष्ट्रीय पातळीवरच्या सर्व मुद्द्यांवर चर्चा केंद्रीभूत ठरणे अपेक्षित असताना विरोधक त्यापासून दूर पळून स्थानिक आणि प्रादेशिक अस्मितांचा आधार घेत निवडणुकीच्या लाटांमध्ये तरंगण्याचा प्रयत्न करत आहेत. वर उल्लेख केलेली सगळी उदाहरणे तशीच आहेत.

Opposition leaders trying to save their faces in the name of regional prides

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात