पवारांची राहुल स्तुती : मोदी राहुल गांधींची खिल्ली उडवतात, पण बहुसंख्य वर्ग त्यांच्याकडे गांभीर्याने पाहतो!!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच राहुल गांधींची खिल्ली उडवतात. त्यांची टिंगल करतात, पण देशातला बहुसंख्य वर्ग राहुल गांधींकडे गांभीर्यानेच पाहतो, अशा शब्दांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पवार गटाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी राहुल गांधींच्या नेतृत्वाची स्तुती केली, पण पवारांच्या या अचानक स्तुतीमुळे पवारांना केंद्रात राहुल गांधींचे नेतृत्व मान्य करून महाराष्ट्रात त्यांच्याकडून सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करवून घ्यायचे आहे का??, सवाल निर्माण झाला.Only PM Modi makes fun of Rahul Gandhi, but others take him seriously, claims sharad pawar

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि त्याआधी देखील राहुल गांधी देशातल्या राजकीय चर्चेचा केंद्रबिंदूच राहिले. परंतु, त्यांच्या स्वतःच्या वक्तव्यांमधून त्यांची प्रतिमा “पप्पू” अशी बनली गेली. परंतु, या प्रतिमेचे खापर शरद पवारांनी नरेंद्र मोदींवर फोडले.आता राहुल गांधी हे राजकारणाबाबत गंभीर आहेत. पण पंतप्रधान नरेंद्र मोदीच फक्त त्यांची टिंगल करतात. देशातील बहुसंख्य जनता राहुल गांधींकडे गांभीर्यानेच पाहते असा दावा शरद पवार यांनी केला.

शरद पवार म्हणाले :

भाजपाला बहुमतापेक्षा कमी जागा मिळाल्या तर देशातील समविचारी पक्षांना एकत्र आणून आम्ही देशाला एक स्थिर सरकार देण्याचा नक्कीच प्रयत्न करू. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मागच्या दोन्ही लोकसभा निवडणुकांपेक्षा कमी जागा मिळतील. महाराष्ट्रातील त्यांच्या जागा कमी होतील. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत आम्हाला म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला मिळून महाराष्ट्रात केवळ 5 जागा मिळाल्या होत्या. मात्र यावेळी त्या जागा वाढणार आहेत.

2019 मध्ये च्या लोकसभा निवडणुकीत मध्य प्रदेशात काँग्रेसला केवळ 1 जागा मिळाली होती. त्यामध्ये यंदा सुधारणा दिसेल. राजस्थान आणि गुजरातमध्ये काँग्रेसला एकही जागा मिळाली नव्हती, त्या दोन्ही राज्यात काँग्रेसला यंदा काही जागा मिळतील. हरियाणा, पंजाब आणि दिल्ली या तिन्ही राज्यातील काँग्रेसच्या स्थितीत सुधारणा दिसेल, तर तामिळनाडू, केरळ, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये भाजपाचा फारसा प्रभाव नाही, त्यमुळे त्यांना तिथे फारसा वाव नाही.

राहुल गांधी यांचा दृष्टीकोन आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्यांचा दृष्टीकोन बदलला आहे. 2019 नंतर त्यांनी जी यात्रा वगैरे काढली, त्या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यांच्याकडे नेतृत्व लगेच जाईल असं नाही. पण एकत्रित काम करता येऊ शकतं. त्यांच्या नेतृत्वाच्या शैलीत काही चांगले बदल झाले आहेत. राहुल गांधींचा राजकारणाकडे बघण्याचा दृष्टीकोन अधिक गंभीर आहे. त्यांनी जी पदयात्रा काढली, लोकांच्या भेटी घेतल्या, महिला, तरुण, बेरोजगार, दलित, शेतकरी या सगळ्यांना ते भेटले. यातूनच ते राजकारणाबाबत गंभीर आहे असं दिसतं. याआधी ते राजकारणाबाबत गंभीर नाहीत अशी चर्चा व्हायची. पण आता चित्र बदलले आहे.

एकटे पंतप्रधानच असे आहेत जे राहुल गांधींची टिंगल, टवाळी करतात. त्यांना शहजादे वगैरे म्हणतात. पंतप्रधानांचा हा अपवाद सोडला तर राहुल गांधींकडे बहुसंख्य वर्ग गांभीर्याने पाहतो आहे. ही जमेची बाजू आहे असं म्हणता येईल.

Only PM Modi makes fun of Rahul Gandhi, but others take him seriously, claims sharad pawar

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात