विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोनाच्या लाटेत महाराष्ट्रातील रुग्णांसाठी केंद्र सरकारकडून १३ हजार १७८ व्हेंटिलेटर्स दिले आहेत. त्याचबरोबर १ लाख ९ हजार ४०९ ऑक्सिजन बेड्स पुरविण्यात आले आहेत. आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी ही माहिती दिली.One lakh Oxygen beds, 13 thousand 178 ventilators, Minister of State for Health Dr. Bharti Pawar Information in Parliament
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यात ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर्सची प्रचंड कमतरता निर्मार झाली होती. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत यामुळे लोकांचे मृत्यू झाले. मुंबई आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरातही ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटर्स मिळत नव्हते. यामुळे पीएम केअर्स फंडातून खरेदी करण्यात आलेले व्हेंटिलेटर्स आणि ऑक्सिजन बेड महाराष्ट्रासह इतरही राज्यांना देण्यात आले होते.
संसदेत कॉँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांनी याबाबत प्रश्न विचारताना केंद्र सरकारने दिलेले ऑक्सिजन बेड्स व व्हेंटिलेटर्स अनेक ठिकाणी कार्यरत नसल्याचे दिसून आल्याचा आरोप केला होता. यावर उत्तर देताना डॉ. भारती पवार म्हणाल्या, कोरोना काळात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन बेड व व्हेंटिलेटर नसल्यामुळे रुग्णांवर उपचार करताना अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या.
परंतु, रुग्णालयात वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेता, ही दोन्ही उपकरणे त्यावेळी उपलब्ध नसल्याचे दिसून येत होते. मार्च २०२० पासून तर आजपर्यंत कोरोना काळात केंद्राने महाराष्ट्राला १ लाख ९ हजार ४०९ ¸ऑक्सिजन बेड्स व १३ हजार १७८ व्हेंटिलेटर्स दिले आहेत.
कोरोना काळात मोठ्या प्रमाणात जैविक कचरा निर्माण होत आहे. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी २०२ प्रकल्प आहेत, अशी माहिती पर्यावरण, वन आणि हवामान बदल राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी राज्यसभेत दिली. खासदार डॉ. नरेंद्र जाधव यांनी याबाबत प्रश्न विचारला होता.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App