आंदोलनाच्या वर्धापनादिनानिमित्त दिल्लीत जमणार एक लाख शेतकरी, किसान युनियनची जोरदार तयारी


संसदेच्या हिवाळी अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन केंद्रीय कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा करूनही आंदोलक शेतकरी मात्र दिल्लीत जाण्यावर ठाम आहेत. 26 नोव्हेंबर रोजी आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने शेतकर्‍यांना एकत्र येण्यास सांगण्यात येत आहे जेणेकरून 29 नोव्हेंबर रोजी संसदेकडे निघणार्‍या ट्रॅक्टर ट्रॉली मोर्चात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होऊ शकतील. त्यासाठी शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमेवर पोहोचण्याचे आवाहन केले जात आहे. One lakh farmers will gather in Delhi on the anniversary of Protest, preparation By SKM Rakesh Tikait Says


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन केंद्रीय कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा करूनही आंदोलक शेतकरी मात्र दिल्लीत जाण्यावर ठाम आहेत. 26 नोव्हेंबर रोजी आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने शेतकर्‍यांना एकत्र येण्यास सांगण्यात येत आहे जेणेकरून 29 नोव्हेंबर रोजी संसदेकडे निघणार्‍या ट्रॅक्टर ट्रॉली मोर्चात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होऊ शकतील. त्यासाठी शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमेवर पोहोचण्याचे आवाहन केले जात आहे.

जोपर्यंत कृषी कायदे संसदेतून औपचारिकपणे मागे घेतले जात नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे हटणार नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. आंदोलनाला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने 26 नोव्हेंबर रोजी दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचा ओघ सुरूच राहणार आहे.

शेतकरी संघटनांच्या या आवाहनानंतर मोठ्या संख्येने शेतकरी राष्ट्रीय राजधानीच्या सीमेवर पोहोचू लागले आहेत. पंजाबमध्ये दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांना एकत्र करण्यासाठी विविध कृषी संघटनांकडून बैठका आयोजित केल्या जात आहेत. सिंघू, टिकरी सीमा आणि बहादूरगड येथे मोठ्या संख्येने शेतकरी येण्याची शक्यता असून तशी तयारीही सुरू आहे.आगामी हिवाळी अधिवेशनात संसदेकडे प्रस्तावित ट्रॅक्टर मोर्चाबाबत शेतकरी नेते राकेश टिकैत म्हणाले की, २९ नोव्हेंबर रोजी शेतकरी संसदेपर्यंत ट्रॅक्टर मोर्चा काढणार आहेत. शेतकरी संघटनांची संघटना असलेल्या संयुक्त किसान मोर्चा (SKM) ने काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती की, केंद्राच्या तीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलनाला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने 29 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात 500 शेतकरी संसदेत पोहोचतील. शांततापूर्ण ट्रॅक्टर मोर्चात सहभागी होतील.

सरकारने खुल्या केलेल्या रस्त्यांवरून शेतकरी ट्रॅक्टर मोर्चा काढणार असल्याचे टिकैत यांनी म्हटले आहे. रास्ता रोको करण्याचा आपला हेतू नसून सरकारशी चर्चा करण्याचा आहे, असेही ते म्हणाले.

One lakh farmers will gather in Delhi on the anniversary of Protest, preparation By SKM Rakesh Tikait Says

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात