या घटनेप्रकरणी एका व्यक्तिसह तीन अल्पवयीन मुलांना अटक करण्यात आली आहे
विशेष प्रतिनिधी
पुणे : हडपसर भागात एका ४७ वर्षीय व्यक्तीने मोबाईलचे ‘हॉटस्पॉट ( Mobile hotspot ) कनेक्शन’ अनोळखी व्यक्तींसोबत शेअर करण्यास नकार दिल्याने 47 वर्षीय व्यक्तीची भोसकून हत्या करण्यात आली. पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, रविवारी रात्री उशिरा झालेल्या या घटनेत एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, तरुणांचा एक गट कुलकर्णी यांच्याकडे आला आणि त्यांना त्याचे मोबाइल हॉटस्पॉट कनेक्शन शेअर करण्यास सांगितले होते. मात्र त्यांनी अनोळखी व्यक्तींना हॉटस्पॉट देण्यास नकार दर्शवल्याने, त्यांची हत्या केली गेली.
या घटनेप्रकरणी मयूर भोसले (१९) नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली असून तीन अल्पवयीन मुलांना पकडण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
पुण्यात गुन्हेगारी घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. शिवाय, गँगवॉरच्याही घटना घडत आहेत. नुकतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकाची गोळ्या झाडून हत्या झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App