वयाच्या 100 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
विशेष प्रतिनिधी
इंदुर : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव ( Mohan Yadavs ) यांच्या वडिलांचे निधन झाले आहे. त्यांचे वडील पूनमचंद यादव दीर्घकाळ आजारी होते. ते 100 वर्षांचे होते. याची माहिती मिळताच मुख्यमंत्री मोहन यादव उज्जैनला रवाना झाले आहेत.
याआधी सोमवारी मुख्यमंत्री मोहन यादव आणि केंद्रीय मंत्री आणि गुनाचे खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी त्यांच्या वडिलांची रुग्णालयात भेट घेतली आणि मंगळवारी संध्याकाळी त्यांचे निधन झाले. या वृत्ताने त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या वडिलांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. शिवराज सिंह चौहान म्हणाले की, मोहनजी यांच्या वडिलांच्या निधनाची बातमी ऐकून दुःख झाले आहे. ईश्वर त्यांना आपल्या चरणी स्थान देवो आणि शोकाकुल परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. शिवराज सिंह चौहान व्यतिरिक्त इतर अनेक नेत्यांनी मोहन यादव यांच्या वडिलांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more