राहुल गांधी चिनी ड्रोनशी खेळले; चीनला शत्रू मानूच नका, सॅम पित्रोदा बरळले!!

नाशिक : राहुल गांधी राजधानीतल्या आपल्या घराच्या अंगणात चिनी ड्रोनशी खेळले, त्यानंतर चीनला शत्रू मानूच नका, असे राहुल प्रिय सॅम पित्रोदा बरळले!!

त्याचे झाले असे :

राहुल गांधी नवी दिल्लीत आपल्या घराच्या अंगणातच चिनी ड्रोनशी खेळले. त्यांनी ड्रोन विषयक तंत्रज्ञान भारतीयांना “शिकवले.” भविष्यात ड्रोन कुठे कसा किंवा उपयोगी पडेल?? युद्ध तंत्रज्ञान आणि युद्ध शास्त्र त्यामुळे कसे बदलेल??, याचे ज्ञान राहुल गांधींनी भारत यांना दिले. हे ज्ञान देताना जो ड्रोन राहुल गांधींनी हातात धरला होता, तो चिनी बनावटीचा होता. ड्रोन निर्मिती तंत्रज्ञानात चीनने कशी भरारी मारली आहे, याचे बहारदार वर्णन राहुल गांधींनी त्या ड्रोनशी खेळताना केले.

राहुल गांधींकडून चीन स्तुतीची “हिंट” मिळताच त्यांचे “प्रिय” सल्लागार सॅम पित्रोदा राहुल गांधींच्या एक पाऊल पुढे टाकत बोलले, चीनला तुम्ही शत्रू मानूच नका. भारताने चीनला शत्रू मानणे हे चीनवर अन्यायकारक आहे, असा “जावईशोध” सॅम पित्रोदा यांनी लावला. सध्याच्या काळात भारताने जगात कसे वागावे??, भारताचे परराष्ट्र धोरण असे असावे?? याचे “डोस” सॅम पित्रोदा यांनी पाजले. भारताने चीनला शत्रू मानू नये. जगाचा कंट्रोल आणि कमांड आपल्याच हातात असावा, हा “माईंडसेट” सोडून द्यावा. जगाबरोबर संघर्ष करत बसण्यापेक्षा जगाशी सुसंवाद राखून हातात हात घालून काम करावे. चीन प्रबळ होतो आहे. सुसंपन्न होतो आहे, त्याचा आदर राखावा. जगात सगळेच देश मोठे होत चाललेत. कुणी वेगाने मोठा होतोय, तर कोणी कमी वेगाने पुढे सरकतोय, पण सगळेच पुढे सरकत आहेत. भारताने देखील आपले “एटीट्यूड” बदलून जगाच्या बरोबरीने चालावे. उगाच कुणाशी शत्रुत्व घेऊ नये, असा उपदेश सॅम पित्रोदा यांनी केला.

चिनी ड्रोनशी खेळण्याच्या राहुल गांधींच्या “आयडियेच्या कल्पनेशी” सॅम पित्रोदा सुसंगतच वागले. कारण चिनी ड्रोनच्या तंत्रज्ञानाचा भारतीयांना उपदेश करताना भारतातले शेतकरी, भारतातले सैनिक ड्रोनचा वापर आधीपासूनच करत आहेत. भारतात ड्रोन दीदी योजना लागू होऊन आता एक वर्ष पूर्ण होत आले आहे. शेतकरी महिला ड्रोन वापरायला शिकल्या आहेत, हे सगळे राहुल गांधी विसरलेच होते. किंबहुना भारतातली ड्रोन तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगती राहुल गांधींच्या गावीही नव्हती.

नेमके तसेच सॅम पित्रोदा यांच्याबाबतीत घडले. भारताने चीनला शत्रू मानू नये, असा उपदेश करताना सॅम पित्रोदा चीनने भारताची लाखो हेक्टर भूमी बळकावल्याचे विसरून गेले. 1962 च्या युद्धात चीनने भारताचा पराभव केला, तो चीन बळकट होता म्हणून नव्हे, तर भारत नेहरूंच्या नेतृत्वाखाली दुबळा राहिला म्हणून चीन भारताचा पराभव करू शकला, हे वास्तव सॅम पित्रोदांनी वाचलेच नाही. किंवा वाचून त्यांना ते “कळलेच” नाही.

लडाख क्षेत्रात चिनी सैनिकांनी घुसखोरी केली. २० भारतीय सैनिकांना मारले. पण भारतीय सैनिकांनी 42 चिनी सैनिकांना मारून चीनवर सूड उगवला हे सॅम पित्रोदांना “कळलेच” नाही. चीन प्रबळ होतो आहे सुसंपन्न होतो आहे त्याचा आदर राखावा असे सॅम पित्रोदा म्हणाले, पण भारत चीन पेक्षा वेगाने प्रगती करतो आहे. चीनला टक्कर द्यायच्या क्षमतेचा बनत‌ चालला आहे. युरोप आफ्रिका अमेरिका आणि आशिया या चारही खंडांमध्ये भारताच्या प्रगतीचा वेग पहिल्या दोन-तीन क्रमांकावरचा आहे हे सॅम पित्रोदा यांच्या गावीही दिसले नाही. त्यांना फक्त चीनची प्रगती आणि संपन्नता “दिसली” आणि भारताची प्रगती चीनच्या बरोबरीने होण्याची “भीती” त्यांना वाटली म्हणूनच भारताच्या परराष्ट्र धोरणाविषयी त्यांनी गोड गुलाबी शब्दांमध्ये “माघारीचे तत्त्वज्ञान” शिकवत उपदेशाचे डोस पाजले!!

On whether US President Donald Trump and PM Modi will be able to control the threat from China

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात