विशेष प्रतिनिधी
रायपूर : छत्तीसगडमधील 173 शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळवला आहे. भाजपने सर्व 10 महानगरपालिकांमध्ये महापौर पदे जिंकली आहेत, 35 नगर परिषदांमध्ये आणि 81 नगर पंचायतींमध्ये अध्यक्षपदे मिळवली आहेत.
काँग्रेसने 8 नगर परिषद आणि 22 नगर पंचायतींमध्ये अध्यक्षपदे मिळवली, तर आम आदमी पक्ष (AAP) आणि बहुजन समाज पक्ष (BSP) यांनी प्रत्येकी एक नगर परिषद/नगर पंचायतीचे अध्यक्षपद जिंकले आहे. स्वतंत्र उमेदवारांनी 5 नगर परिषद आणि 10 नगर पंचायतींमध्ये अध्यक्षपदे मिळवली आहेत.
मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी हा ऐतिहासिक विजय असल्याचे म्हटले आहे. भाजपच्या विकासकार्यांवर जनतेने दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. भाजपचा शहरी निवडणूक जाहीरनामा’ अटल विश्वास पत्र’ यावर लोकांनी पसंतीची मोहोर उठवली. त्यातील आश्वासने पूर्ण करण्याचे वचन दिले त्यांनी दिले आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष दीपक बैज यांनी निवडणुकीच्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. निवडणुकीच्या तारखा आणि मतदान पद्धतीत झालेल्या बदलांवर टीका केली आहे. पुन्हा एकदा ईव्हीएम वर रडगाणे गात ईव्हीएमच्या बिघाडाबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
रायगड महानगरपालिकेत भाजपने चहा विक्रेता जीवर्धन चौहान यांना महापौर पदासाठी उमेदवारी दिली होती. त्यांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे.
2019-2020 मध्ये तत्कालीन भूपेश बघेल सरकारने महापौर आणि अध्यक्ष पदांसाठी अप्रत्यक्ष निवडणूक प्रणाली लागू केली होती,l. ज्यामध्ये नागरिक नगरसेवक निवडत आणि नंतर हे नगरसेवक महापौर किंवा अध्यक्ष निवडत. मात्र, या वेळी साय सरकारने थेट निवडणूक प्रणाली पुन्हा लागू केली. नागरिकांना थेट महापौर आणि अध्यक्ष निवडण्याचा अधिकार मिळाला आहे.
या निकालांमुळे छत्तीसगडमधील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपची स्थिती अधिक मजबूत झाली आहे. राज्यात गेल्या वेळी सत्तेत असलेल्या काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App