विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : जगातल्या काही विशिष्ट उदाहरणांवरून सगळी जागतिक लोकशाहीच धोक्यात आल्याच्या बाता मारणाऱ्या युरोपला भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खडे बोल सुनावले. जर्मनीमध्ये म्युनिक सिक्युरिटी कॉन्फरन्स मध्ये ते बोलत होते. युरोप आणि अमेरिकेतले सिनेटर या कॉन्फरन्स मध्ये सहभागी झाले होते या सगळ्यांचा सूर जागतिक लोकशाही धोक्यात आल्याचा होता. मात्र, जयशंकर यांनी ठामपणे त्यांचा मुद्दा नाकारला.
जयशंकर म्हणाले :
केवळ कुठल्यातरी विशिष्ट उदाहरणांवरून जागतिक लोकशाही धोक्यात आल्याच्या बाता मारण्यात मतलब नाही. माझ्या देशात गेल्याच वर्षी सार्वत्रिक निवडणुका झाल्या 90 कोटी मतदारांपैकी साधारण 75 कोटी मतदारांनी मतदान केले. त्याचा निकाल सगळ्या जगाने पाहिला. गेल्या कित्येक वर्षांमध्ये भारतात सातत्याने निवडणूक होऊन सरकारी बदलणे ही सामान्य प्रक्रिया झाली आहे. प्रत्येक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढलेली दिसते. दिल्लीत देखील नुकत्याच निवडणुका होऊन लोकांनी मतदान करून तिथले सरकार बदलले.
निवडून आलेली सरकारे जनकल्याण्याच्या योजना राबवतात. 80 कोटी जनतेला गेल्या पाच वर्षांमध्ये विशिष्ट धान्य मोफत मिळाले ही भारतातल्या लोकशाहीची यशस्वीतेची खुण आहे.
त्या उलट काही पाश्चात्य देशच ग्लोबल साउथ मधल्या लोकशाही विरोधी देशांना पोसत असतात. तिथल्या लष्करी राजवटींना मदत करतात. भारताच्या शेजारची राष्ट्रीय याची उदाहरणे आहेत. अनेक ठिकाणी डीप स्टेट काम करते. पण भारताच्या जनतेने भारतात लोकशाही विरोधी कुठल्याच गोष्टी सहन केल्या नाहीत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App