वृत्तसंस्था
जयपूर : आपले सरकार किती पारदर्शकपणे काम करते असे सांगणाऱ्या मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना आज शिक्षकांकडून अचानक प्रतिटोला खावा लागला. शिक्षकांच्या एका सत्कार समारंभात अशोक गहलोत भाषण करत असताना हा प्रकार घडला.On the face of Rajasthan Chief Minister Ashok Gehlot, the teachers said, yes !, you have to pay for the transfer
मुख्यमंत्री अशोक गहलोत हे शिक्षकांपुढे राज्यातल्या शैक्षणिक धोरण या विषयी भाषण करत होते. यांनी भाषणात उस्फूर्तपणे शिक्षकांना विचारले, की तुम्हाला हव्या त्या ठिकाणी बदली मिळवण्यासाठी पैसे द्यावे लागतात काय…?? गेहलोतांचा हा प्रश्न संपतो न संपतो तोच सगळ्या सभागृहातल्या शिक्षकांनी एकदम हात वर करून ओरडून सांगितले, “होय आम्हाला बदली मिळवण्यासाठी पैसे द्यावे लागतात…!!”
शिक्षकांचा हा अचानक आलेला प्रतिसाद पाहून अशोक गेहलोत चमकून गेले. व्यासपीठावरचे अन्य मान्यवर देखील गडबडले. पण एखाद्या कसलेल्या राजकारण्याप्रमाणे अशोक गेहलोत यांनी आपली बाजू सावरत, ठीक आहे. आता आपण बदल्यांची पॉलिसीच बदलून टाकू असे सांगून भाषणातून काढता पाय घेतला.
#WATCH | At a felicitation program for teachers, in Jaipur, Rajasthan CM Ashok Gehlot asks them if they need to pay money for a transfer. The teachers respond with "Yes". The CM says, "It's very unfortunate that teachers need to pay money for transfer. A policy should be made…" pic.twitter.com/YWAl9QTkSH — ANI (@ANI) November 16, 2021
#WATCH | At a felicitation program for teachers, in Jaipur, Rajasthan CM Ashok Gehlot asks them if they need to pay money for a transfer. The teachers respond with "Yes". The CM says, "It's very unfortunate that teachers need to pay money for transfer. A policy should be made…" pic.twitter.com/YWAl9QTkSH
— ANI (@ANI) November 16, 2021
त्याआधी शिक्षण मंत्री दोस्तारा यांनी शिक्षकांना बदल्यांसाठी पैसे द्यावे लागण्याची पॉलिसी बदलण्याची गरज व्यक्त केली होती. तोच धागा पकडून अशोक गहलोत यांनी आपले सरकार शिक्षकांसाठी पारदर्शकपणे काम करेल असे सांगितले पण नेमका त्यांनी शिक्षकांना बदली मिळवण्यासाठी पैसे द्यावे लागतात का?
#WATCH | Rajasthan Minister for School Education, Govind Singh Dotasra says, "…CM wanted to indicate that people pay money. It will be scrapped with the implementation of a policy for the transfer of teachers during the tenure of CM and me." pic.twitter.com/PLAn5cgjbY — ANI (@ANI) November 16, 2021
#WATCH | Rajasthan Minister for School Education, Govind Singh Dotasra says, "…CM wanted to indicate that people pay money. It will be scrapped with the implementation of a policy for the transfer of teachers during the tenure of CM and me." pic.twitter.com/PLAn5cgjbY
, हा प्रश्न विचारला आणि शिक्षकांनी त्या प्रश्नाला उस्फूर्तपणे जे प्रत्युत्तर दिले त्यातून तोच राजस्थानात चर्चेचा विषय बनला आहे. शिक्षकांनी मुख्यमंत्र्यांना तोंडावर कसे सणसणीत प्रत्युत्तर दिले याची चर्चा सोशल मीडिया देखील सुरू झालीआहे.
मुख्यमंत्र्यांनी विचारलेला प्रश्न आणि शिक्षकांनी उस्फूर्तपणे दिलेले उत्तर याचे व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसत आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेने त्याचा व्हिडिओ ट्विट केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App