विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : रामनवमीच्या दिवशी देशातील बहुतांश नागरिक मांसाहार करत नाहीत. परंतु, मुद्दामहून याच दिवशी मांसाहार करण्याचा हट्ट करत जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमधील (जेएनयू) डाव्या विचारधारेच्या विद्यार्थ्यांनी धरला. यावरून त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली.On the day of Ram Navami, non-vegetarians in JNU attacked Abhavip activists
जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी स्टुडंट्स युनियनच्या (जेएनयूएसयू) अध्यक्षा आयशी घोष यांनी रविवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) सदस्यांवर विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये मांसाहारी पदार्थ खाण्यापासून रोखल्याचा आणि हिंसाचाराचा आरोप केला. डाव्या सदस्यांनी अभाविप सदस्यांवर संध्याकाळी दगडफेक केल्याचा आरोप केला.
ज्यामध्ये काही विद्यार्थी जखमी झाले. मेसच्या सचिवावरही अभाविपच्या विद्यार्थ्यांनी हल्ला केल्याचा आरोप आहे. मित्रांनो, अभाविप पुन्हा ते करत आहेत. आधी त्यांनी कावेरी वसतिगृहात सर्वांवर मांसाहार बंदी लादण्याचा प्रयत्न केला. जेव्हा सामान्य विद्यार्थी नॉनव्हेज फॅसीझमच्या विरोधात उभे राहिले, तेव्हा संघाच्या गुंडांनी सर्वत्र हिंसाचार केला.
पोलिस उपायुक्त (दक्षिण-पश्चिम) मनोज सी म्हणाले की, दोन्ही बाजूचे सहा जण किरकोळ जखमी झाले आहेत.दरम्यान, सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोत डाव्या गटातील विद्यार्थ्यांनी आपल्याला मारहाण झाल्याचा कांगावा केला आहे. या फोटोंमध्ये काही विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होताना दिसतो.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App