वृत्तसंस्था
नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिएंट ओमिक्रॉनमुळे संपूर्ण जगात पुन्हा भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा हा नवा व्हेरिएंट खूपच शक्तीशाली असून वेगावे पसरत आहे. ओमिक्रॉनच्या भीतीमुळे जगभरातील देश सतर्क झाले असून आधीच उपाययोजना आखत आहेत.Omicron warns India
भारतात देखील हालचालींना सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका घेत निर्देश जारी केले आहेत.
याचदरम्यान जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन (Dr. Soumya Swaminathan) यांनी कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनवरुन भारताला गंभीर इशारा दिला आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीशी बोलताना सौम्या स्वामीनाथन यांनी भारतीय नागरिकांना खबरदारी घेण्याचे आणि मास्कचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. मास्क हे तुमच्या खिशातील लस आहे जी विशेषत: घरातील सेटिंग्समध्ये अत्यंत प्रभावी असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ओमिक्रॉन भारतात कोविडच्या (Covid-19) योग्य उपचारांसाठी चेतावणी ठरु शकतो, असे देखील मत त्यांनी व्यक्त केले आहे.
ओमिक्रॉनशी लढण्यासाठी विज्ञान-आधारित धोरणाची गरज आहे. सर्व वयोवृद्धांचे संपूर्ण लसीकरण, मोठ्या प्रमाणात एकत्र येणे टाळणे, कोणतीही लक्षणे दिसली तर बारकाईने निरीक्षण करणे गरजेचे आहे.
तसेच ओमिक्रॉनबाबत शास्त्रज्ञांनी काही टिप्स दिल्या आहेत ज्यामुळे चिंता कमी होऊ शकते. हा प्रकार डेल्टापेक्षा अधिक संसर्गजन्य असू शकतो. अद्याप अधिकृतपणे काहीही सांगता येत नसले तरी सुद्धा त्या म्हणाल्या की आम्हाला काही दिवसांत या स्ट्रेनबद्दल अधिक माहिती मिळेल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App