विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – देशातील बॅंकांना गंडा घालून परदेशात पळून जाणाऱ्या सर्व कर्जबुडव्यांचा माग काढण्यात येईल आणि आपल्या बॅंकांतून जो पैसा परदेशात गेला आहे तो परत आणण्यात येईल.’’ असे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले आहे.Sitaraman assured for bringing back money
ही फसवणूक करणारी मंडळी देशात आहेत की देशाबाहेर यामुळे फारसा फरक पडणार नाही. केंद्र पुरस्कृत सर्व योजना आणि पंतप्रधान विकास पॅकेजचा सर्व नागरिकांना लाभ मिळावा म्हणून राज्य सरकारसोबत योग्य समन्वय ठेवून काम केले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
बॅंकांमधील गैरव्यवहार आता खपवून घेतले जाणार नाहीत. एखाद्याने कर्ज घेतले असेल आणि ते परत केले जात नसेल तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. बॅंकांमधून जो पैसा बाहेर पडला आहे तो मूळ प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जाईल असेही त्या म्हणाल्या.
सीतारामन म्हणाल्या की, ‘‘करदात्यांचा पैसा बुडवून परदेशात पलायन करणाऱ्या मंडळींना शोधून काढण्यात येईल. जगाच्या पाठीवर ते कोठेही असो त्यांना शोधून काढण्यात येईल. कायदेशीर कारवाईच्या माध्यमातून त्यांच्या मालमत्तांवर टाच आणण्यात येईल.’’
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App