त्रिपुरातील “सोंदेश” लागला ममतांना कडू, भाजपला गोड!! पण तो मधूर कुणाला लागलाय?


त्रिपुरात विधानसभेची निवडणूक नव्हती. फार मोठी मतदार संख्या असलेली देखील निवडणूक नव्हती. ५ लाख मतदानाच्या आतले मतदान होते. छोटेखानी आगरतळा महापालिकेची आणि नगरपंचायतींची साधी निवडणूक होती. त्रिपुरा सारख्या राज्याकडे कोणाचे लक्षही जात नाही. तिथल्या मोठ्यातल्या मोठ्या निवडणुका also ran म्हणून कव्हर केल्या जातात.Tripura results shows mamata’s political limits, brought much Joy to BJP and even. Congress

पण आजच्या निवडणुकीच्या निकालांवरून सगळ्या देशाचे लक्ष त्रिपुरा सारख्या छोट्या राज्याकडे गेले आहे. तेथे भाजपला अभूतपूर्व यश मिळाले आहे. या यशाची टक्केवारी 98 % ते 100% यांच्या रेंजमध्ये आहे.

पण तरी देखील संपूर्ण देशाचे लक्ष त्रिपुरा कडे जावे याचे श्रेय एकट्या भाजपला अजिबात नाही. ते श्रेय विभागून ममता बॅनर्जी यांना द्यावेच लागेल…!! कारण त्यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाने त्रिपुरा सारख्या छोट्या राज्यावर आपले लक्ष केंद्रित करून मोठी हवा निर्माण केली होती आणि त्यामुळेच दिल्लीतल्या मीडियाचे लक्ष त्रिपुरा कडे गेले होते. आणि आता त्याच अनुषंगाने त्रिपुराच्या निवडणुकीचे विश्लेषण होताना दिसते आहे. त्रिपुरात भाजपने प्रचंड विजय मिळवला. ममता बॅनर्जी यांची हिंसक राजकारण तिथे चालले नाही. ममता बॅनर्जी यांचा करिश्मा फक्त बंगाल पुरता मर्यादित आहे. तेथे त्यांचा हिंसाचार खपून गेला. पण त्रिपुरात तो चालला नाही. जनतेने ममता बॅनर्जी यांना धुडकावून लावले, वगैरे राजकीय मल्लीनाथी भाजपच्या प्रवक्त्यांनी आणि काही राजकीय विश्लेषकांनी चालविली आहे. पण त्रिपुरामध्ये मिळालेला “राजकीय सोंदेश” हा त्या पलिकडे देखील काही सांगून जातोय, त्याकडे फारसे कुणाचे लक्ष गेलेले दिसत नाही…!!


त्रिपुरात भाजप १० नगरपंचायतींमध्ये १००% बिनविरोध; ११ आगरतळा महापालिकेसह १४ नगरपंचायतींमध्ये ९८% यश; सर्व विरोधकांना मिळून ५ जागा!!


त्रिपुरा मधला “सोंदेश” ममता बॅनर्जींना कडू लागला हे खरेच आहे. भाजपला तो जास्तच गोड लागला आहे, देखील खरे आहे. पण तो फक्त भाजपलाच गोड लागला आहे असे नाही तर तो “सोंदेश” काँग्रेस पक्षाला देखील गोड लागलेला आहे…!! कारण ममता बॅनर्जी यांचा करिष्मा पश्चिम बंगालच्या पलिकडे मतदारांवर चालणार नाही याचे महत्त्वपूर्ण राजकीय सूतोवाच त्रिपुराने केले आहे…!!

ममता बॅनर्जी यांची गेल्या सहा महिन्यातील ही वाटचाल पाहिली तर त्या भाजपवर तोंडी फैरी झाडताना दिसल्या पण प्रत्यक्षात त्यांनी काँग्रेस पक्ष बाकीच्या राज्यांमध्ये जाऊन पोखरला. त्यांनी तोंडी भाषा विरोधी ऐक्याची वापरली. प्रत्यक्षात मुख्य विरोधी पक्ष काँग्रेसला त्यांनी सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला. त्रिपुरात ममता बॅनर्जी यांना अपेक्षित असणारे यश मिळाले असते तर त्यांची चढाई काँग्रेसवर आणखी जोमाने झाली असती हे लक्षात घेतले तर त्रिपुरातल्या जनतेने त्यांना अटकाव कसा केला हे लक्षात येईल. त्यामुळे त्रिपुरातला “सोंदेश” काँग्रेसला देखील मधूरच लागला आहे.

ममता बॅनर्जी या बाकीच्या राज्यांमध्ये काँग्रेसला नामोहरम करण्याचा प्रयत्न करतील पण त्यांना निवडणुकीमध्ये अपेक्षित असे यश मिळण्यासाठी त्या पलिकडे जाऊनही प्रयत्न करावे लागतील आणि यश मिळेलच याची खात्री देता येणार नाही हा त्रिपुरातल्या जनतेने खऱ्या अर्थाने दिलेला दणका आहे आणि तो काँग्रेससाठी सुखद धक्का आहे. कारण बाकीच्या राज्यांमध्ये ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस फोडली तरी देखील निवडणुकीचे यश तर त्यांना असेच दुष्प्राप्य असेल म्हणजे मिळणार नसेल तर त्यांच्याकडे वळणारे काँग्रेसजन देखील जरा बिचकतील आणि कदाचित काँग्रेसचे राजकीय क्षरण रोखता येईल, असा काँग्रेस नेत्यांचा होरा असू शकतो.

त्रिपुरातील अनुभव लक्षात घेता तो फारसा गैर आहे असे म्हणता येणार नाही. अर्थात त्रिपुरातला धडा ममता बॅनर्जी यांनी नीट घेतला तर त्या बाकीच्या राज्यांमध्ये आपली राजकीय खेळी बदलू शकतात. त्यात आणखीन काही मोडिफिकेशन आणू शकतात. पण ममता बॅनर्जी यांच्यासाठी हा संदेश आणखी महत्त्वाचा आहे की नुसती बाकीच्या राज्यांमध्ये नुसती हवा निर्माण करून यश मिळणार नाही तर खऱ्या अर्थाने संघटन उभे करून मेहनत घ्यावी लागेल आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या एकट्यावर अवलंबून निवडणुकीत यश मिळणार नाही. त्रिपुरातील निवडणूक ममतांसाठी शितावरून भाताची कसोटी असल्यासारखीच झाली आहे.

Tripura results shows mamata’s political limits, brought much Joy to BJP and even. Congress

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण