विशेष प्रतिनिधी
जैसलमेर : राजस्थानातील जैसलमेरच्या रामदेवरा मध्ये लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचा दौरा होता त्यावेळी अचानक आपल्या एका मित्राला पाहून ते गहिवरले आणि त्याची कहाणी ऐकून बिर्ला यांनी ताबडतोब आपल्या मित्राच्या उपचाराचीही व्यवस्था केली. om birla school friend found and help him
ही कहाणी अशी :
जैसलमेर जिल्ह्यातील रामदेवरा येथे एक गृहस्थ राजू हे रामदेव समाधी स्थळावर सफाईचे काम करतात. ओम बिर्ला रामदेवरा येथे दौऱ्यावर आले असताना अचानक त्यांची गाठ राजू यांच्याशी पडली आणि त्यांना धक्का बसला. कारण राजू आणि ओम बिर्ला कोटा मधील हायस्कूलमध्ये सहावी ते आठवी एका वर्गात शिकत होते. ओम बिर्लांना त्यावेळचा राजू आठवला. बिर्लांनी त्याच्या जवळ जाऊन त्याची आस्थेने चौकशी केली.
राजू यांना कॅन्सरसह अनेक विकार आहेत हे ऐकल्यानंतर बिर्ला यांनी ताबडतोब त्यांच्या उपचाराची व्यवस्था केली. राजू यांना ओम बिर्लांना पाहून सगळ्या जुन्या गोष्टी आठवल्या. राजू यांना देखील गहिवरून आले. त्यांनी ओम बिर्लांकडे आपल्या उपचाराची व्यवस्था आणि दोन वेळच्या अन्नाची व्यवस्था करण्याची मागणी केली. ती बिर्लांनी ताबडतोब मान्य केली आणि दिल्लीतील उत्तम सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचारांची व्यवस्था केली. त्याच्याशी नियमित संपर्कात राहण्याची देखील व्यवस्था करायला कर्मचाऱ्यांना सांगितले.
ओम बिर्ला यांच्याबरोबर तिथे आलेल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना या अनोख्या भेटीमुळे कृष्ण सुदामा भेटीची आठवण झाली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more