विशेष प्रतिनिधी
मुंबई : MP Sawant भाजपच्या नेत्या व आता शिंदेसेनेकडून मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या शायना एन.सी. यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने उद्धवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांच्यावर शुक्रवारी मुंबईतील नागपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ‘आयुष्यभर भाजपमध्ये राहिल्या, आता दुसऱ्या पार्टीत गेल्या. इथं ‘इम्पोर्टेड माल’ चालत नाही, फक्त ओरिजिनल मालच चालतो,’ असे वक्तव्य सावंत यांना शायना यांना उद्देशून केले होते. त्यावरून संताप व्यक्त केला जात आहे.MP Sawant
सावंत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना शायना म्हणाल्या की, ‘एका महिलेला माल म्हणणाऱ्यांचे जनता हाल करेल. त्यांची विचारधारा स्पष्ट झाली आहे. तुम्हाला माफी मागावी लागेल. ही महाविनाश आघाडी आहे. याप्रकरणी मी मुंबई पोलिसांकडे तक्रार करणार असून निवडणूक आयोगाकडेही तक्रार करेन. तुम्हाला माफी मागावीच लागेल.’
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी निवडणूक आयोगाकडे खासदार सावंत यांच्याविरुद्ध तक्रार केली आहे. ‘सावंत महाराष्ट्रातील महिलांना मूर्ख समजत आहेत. स्त्रियांबाबत अपमानास्पद शब्द खपवून घेणार नाहीत,’ असा इशाराही त्यांनी दिला.
हेलिकाॅप्टरने एबी फॉर्म पाठवले;शिंदेसेनाही चौकशीच्या फेऱ्यात
विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या अर्ध्या तासात नाशिक जिल्ह्यातील ३ उमेदवारांसाठी हेलिकॉप्टरने ए बी फाॅर्म पाठवणे शिंदेसेनेच्या अंगलट आले. राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी त्याची चौकशी सुरू केली.
देवळाली, दिंडोरी अाणि इगतपुरी हे मतदारसंघ अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसाठी दिलेले असताना येथे शिंदेसेनेच्या तीन उमेदवारांना अधिकृत उमेदवारी देण्याचे नवे नाट्य घडले. विशेष म्हणजे हे एबी फाॅर्म थेट हेलिकॉप्टरने अाल्याने अाता याची चाैकशी होणार अाहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने एअर ट्रॅफिक कंट्रोल रूमकडेही विचारणा केल्याचे समजते. हे हेलिकॉप्टर नेमके कुणी आणले, त्यात कोण होते, कोणत्या उमेदवारासाठी हे फॉर्म मागवण्यात आले, त्यासाठी किती खर्च आला यासह विविध प्रकारच्या प्रश्नांची सरबत्ती निवडणूक आयोगाने स्थानिक प्रशासनाकडे केल्याचे समजते.
जिल्हा प्रशासनाने या चौकशीला प्रारंभ केला अाहे. एअर ट्रॅफिक कंट्रोल विभागाकडे त्यासंदर्भात विचारणा केली आहे. याबाबत अहवाल मागवण्यात आल्याचे समजते. जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. अहवाल आल्यानंतर कारवाईचे स्वरूप निश्चित केले जाईल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App