आता रॉकेट स्पीडने मिळणार इंटरनेट, देशात पहिली ‘6G’ लॅब सुरू

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते या लॅबचे उद्घाटन करण्यात आले आहे.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : इंटरनेटच्या क्षेत्रात भारत झपाट्याने प्रगती करत आहे. देशात 5G लाँच होऊन जेमतेम एक वर्ष झाले आहे. दूरसंचार कंपन्या देशाच्या कानाकोपऱ्यात वेगाने 5G सेवा पुरवत आहेत. 5G नंतर भारताने 6G साठीही तयारी सुरू केली आहे. Now Internet will be available at rocket speed the first 6G lab in the country has started

दूरसंचार क्षेत्रात आपली पकड मजबूत करण्यासाठी भारताने आपली पहिली 6G लॅब सुरू केली आहे. देशातील पहिली 6G लॅब नोकियाने बंगळुरूमध्ये सुरू केली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते या लॅबचे उद्घाटन करण्यात आले आहे.

फिनलँडची कंपनी नोकियाने सुरू केलेल्या 6G लॅबचा उद्देश भारतातील 6G तंत्रज्ञानाचे मूलभूत तंत्रज्ञान तयार करणे हा आहे. नोकियाची ही 6G लॅब जागतिक मानकांना सपोर्ट करेल, असा विश्वास आहे.

ही लॅब सुरू केल्यानंतर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, डिजिटल इंडियाने प्रत्येक भारतीयाच्या जीवनावर मोठा प्रभाव पाडला आहे. भारताला नवनिर्मितीचे केंद्र बनवणे ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रमुख दृष्टी आहे आणि त्यासाठी भारतातच नवीन तंत्रज्ञान विकसित करणे आवश्यक आहे आणि 6G लॅब सुरू करणे हे या दिशेने एक मोठे पाऊल आहे.

Now Internet will be available at rocket speed the first 6G lab in the country has started

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात