५०० वर्षांनंतर रामजन्मभूमी परत घेतली, तर ‘सिंध’ का नाही? मुख्यमंत्री योगी यांचे मोठे विधान!

CM Yogi aadityanath

”केवळ एका व्यक्तीच्या जिद्दीमुळे फाळणी झाली…” असेही मुख्यमंत्री योगींनी म्हटले.

विशेष प्रतिनिधी

लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी एका पत्रकार परिषदेदरम्यान सांगितले की, जर रामजन्मभूमी ५०० वर्षांनंतर परत घेतली जाऊ शकते, तर आता पाकिस्तानचा प्रांत असलेला सिंधू आम्ही परत घेऊ शकत नाही, असे कोणतेही कारण नाही. Why not Sindh when Ram Janmabhoomi was retaken after 500 years Chief Minister Yogis big statement

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री योगी रविवारी लखनऊमध्ये राष्ट्रीय सिंधी कॉन्फरन्सला संबोधित करत होते. यावेळी मुख्यमंत्री योगी म्हणाले की, रामजन्मभूमी ५०० वर्षांनंतर परत घेतली आहे. ५०० वर्षांनंतर अयोध्येत भगवान श्री रामाचे भव्य मंदिर उभारले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा रामललाला त्यांच्या मंदिरात प्रतिष्ठित करणार आहेत.

न्यूज साइट पीटीआयने मुख्यमंत्री योगींच्या हवाल्याने म्हटले आहे की, जर रामजन्मभूमी परत घेतली जाऊ शकते, तर आम्ही सिंधू परत घेऊ शकत नाही याचे कोणतेही कारण नाही. योगी म्हणाले की, १९४७ मध्ये फाळणीनंतर सिंधी समाजाचे सर्वाधिक नुकसान झाले. समाजातील नवीन पिढ्यांना इतिहास आणि दु:ख सांगितले पाहिजे. केवळ एका व्यक्तीच्या जिद्दीमुळे फाळणी झाली, असे ते म्हणाले.

याशिवाय ते म्हणाले की, जेव्हा देशाची फाळणी झाली तेव्हा  हजारो लोकांची कत्तल झाली. भारताचा मोठा भूभाग पाकिस्तान बनला. सिंधी समाजाला सर्वात जास्त त्रास सहन करावा लागला कारण त्यांना मातृभूमी सोडावी लागली. आज दहशतवादाच्या रूपाने त्या शोकांतिकेचा फटका आपल्याला सहन करावा लागत असल्याचे ते म्हणाले. कोणताही सुसंस्कृत समाज कधीही दहशतवाद, अतिरेकी किंवा कोणत्याही प्रकारची अराजकत मान्य करू शकत नाही.

Why not Sindh when Ram Janmabhoomi was retaken after 500 years Chief Minister Yogis big statement

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात