‘इस्रायलमध्ये अडकलेले भारतीय लवकरच मायदेशी परततील’, मीनाक्षी लेखी म्हणाल्या ”पंतप्रधान मोदी स्वतः…”


 इस्रायलमध्ये साधारणपणे १८ हजार भारतीय नागरिक राहतात, त्यापैकी बहुतांश विद्यार्थी आहेत.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली :   इस्रायलने हमासच्या दहशतवाद्यांविरुद्ध युद्ध सुरू केले आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी शनिवारी पहाटे इस्त्रायलवर मोठ्या प्रमाणात रॉकेट हल्ला केला. इस्रायलच्या बाजूनेही प्रत्युत्तराची कारवाई करण्यात आली. मात्र या युद्धजन्य परिस्तितीत सध्या अनेक भारतीय नागरिक इस्रायलमध्ये जीव मुठीत धरून अडकलेले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, इस्रायलमध्ये १८ हजार भारतीय नागरिक राहतात, त्यापैकी बहुतांश विद्यार्थी आहेत. Indians stuck in Israel will return home soon Meenakshi Lekhi said Prime Minister Modi himself is monitoring the situation

भारत सरकार सध्याच्या परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे. इस्रायलवर हमासच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याबाबत परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री मीनाक्षी लेखी म्हणाल्या, “मला काल रात्री अनेक संदेश आले आणि आम्ही रात्रभर काम करत होतो. मला हेही माहीत आहे की पंतप्रधान कार्यालय थेट परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. आम्ही सतत  काम करत आहोत.”

याचबरोबर त्या पुढे म्हणाल्या की, “याआधीही आंध्र प्रदेशातील लोकांसह अनेक विद्यार्थी अडकून पडले होते. मग ते ऑपरेशन गंगा असो किंवा वंदे भारत, आम्ही सर्वांना परत आणले आणि मला खात्री आहे की भारत सरकार आणि पंतप्रधान कार्यालय त्यांच्याशी थेट संपर्कात आहे  पंतप्रधान परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.”

भारतीय दूतावासाने आपल्या सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. तेथील नागरिक भारतीय दूतावासाच्या सतत संपर्कात असले, तरी परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण असल्याने ते कमालीचे घाबरलेले  आहेत.

Indians stuck in Israel will return home soon Meenakshi Lekhi said Prime Minister Modi himself is monitoring the situation

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात