हरियाणातील हिसार येथील शाळेतील मुले आणि कर्मचारी सहलीसाठी नैनिताल येथे आले होते.
विशेष प्रतिनिधी
नैनिताल : उत्तराखंडमधील नैनिताल जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. येथे बसचे नियंत्रण सुटून ती दरीत कोसळली. बसमध्ये सुमारे ३२ जण होते. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि एसडीआरएफच्या पथकाने घटनास्थळी बचावकार्य सुरू केले. सुमारे १८ लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. तर रात्री उशीरापर्यंत १४ जण बेपत्ता असल्याची माहिती समोर आली होती. Fatal accident in Nainital bus full of 32 passengers fell into valley 14 missing
मिळालेल्या माहितीनुसार, नैनितालच्या कालाधुंगी रोडवर हा अपघात झाला. हरियाणातील हिसार येथील शाळेतील मुले आणि कर्मचारी सहलीसाठी नैनिताल येथे आले होते. रविवारी रात्री उशिरा एक बस खड्ड्यात पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर स्थानिक पोलिसांनी एसडीआरएफला या प्रकरणाची माहिती दिली. यानंतर एसडीआरएफ कार्यरत झाले आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले.
रिपोर्टनुसार एसडीआरएफ टीमने रात्री उशीरापर्यंत सुमारे १८ लोकांना वाचवले आहे, तर १४ लोक अद्याप बेपत्ता आहेत. बचावकार्यानंतर जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुसरीकडे, पोलिसांसह एसडीआरएफच्या पथकांनी बेपत्ता लोकांचा शोध सुरू केला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App