Uttar Pradesh : उत्तर प्रदेशनंतर आता उत्तराखंडमध्येही कावड मार्गावरील दुकानांवर मालकाचे नाव लिहावे लागणार, आदेश जारी


असे आदेश हरिद्वार पोलीस प्रशासनाने रेस्टॉरंट मालकांना जारी केले आहेत


विशेष प्रतिनिधी

हरिद्वार : उत्तर प्रदेशप्रमाणेच आता उत्तराखंडमध्येही कावड यात्रेच्या मार्गावरील दुकानदारांना हॉटेल आणि ढाब्यांच्या दर यादीसोबत मालकाचेनाव लिहवे लागणार आहे, असे आदेश हरिद्वार पोलीस प्रशासनाने रेस्टॉरंट मालकांना जारी केले आहेत Now in Uttarakhand also the name of the owner will have to be written on the shops on Kavad Marg

हरिद्वारचे एसएसपी परमेंद्र डोबल यांनी सांगितले की, कावड मार्गावरील हॉटेल, ढाबा, रेस्टॉरंट किंवा रस्त्यावरील विक्रेत्यांना त्यांच्या मालकाचे नाव अनिवार्यपणे लिहावे लागेल. तसे न केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.



 

नुकतेच हरिद्वारमधील काही संघटनांनी पोलिसांसमोर मागणी केली होती की, कावड मार्गावर शिवभक्तांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून दुकानदारांनी दुकानांवर त्यांची नावे निश्चितपणे लिहावीत. त्यानंतर आता या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.

मंगळुरू परिसरातील ढाब्यावर लसूण आणि कांदा दिल्याने झालेल्या गदारोळानंतर पोलिसांनी ढाबा आणि हॉटेलचालकांची बैठक घेतली. त्यात पोलिसांनी सांगितले की, कावड यात्रेदरम्यान ढाबे आणि हॉटेलमध्ये लसूण आणि कांद्याचे पदार्थ दिले जाणार नाहीत. तसेच कोणत्याही परिस्थितीत मांसाहार तयार केला जाणार नाही.

Now in Uttarakhand also the name of the owner will have to be written on the shops on Kavad Marg

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात