आता, ॲप देईल भूकंपाचा इशारा, उत्तराखंड ठरले देशातील पहिले राज्य

वृत्तसंस्था

डेहराडून : उत्तराखंडने भूकंपाचा इशारा देणारे ॲप बनविण्याचा पहिले राज्य होण्याचा मान मिळविला आहे. उत्तराखंडचे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरण आणि रुरकीमधील आयआयटीने हे ॲप विकसित केले आहे. Now APP will give intimation regarding earthquake

भूकंपाच्या धक्क्यापूर्वी हे ॲप युजरना सावधानतेचा इशारा देते. त्याचप्रमाणे, भूकंपामुळे ढिगाऱ्याखाली किंवा इतरत्र अडकलेल्या लोकांचे स्थान शोधण्यासाठीही ते मदत करते. संबंधित अधिकाऱ्यांनाही ते सावधान करते. या ॲपबद्दल जनजागृती करण्याचे आवाहनही मुख्यमंत्री धामी यांनी केले. त्याचप्रमाणे, त्यासाठी शाळा व इतरत्र दाखविण्यासाठी लघुपट तयार करण्याची सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली.



स्मार्टफोन नसणाऱ्या नागरिकांना सावधानतेचा संदेश पाठविणाऱ्या फिचरचा ॲपमध्ये समावेश करण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली. ‘उत्तराखंड भूकंप अलर्ट’ या ॲपचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी उद्‌घाटन केले. ॲंड्राईड आणि आयओएस या दोन्हींवर हे ॲप उपलब्ध आहे.

Now APP will give intimation regarding earthquake

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात